Ind vs Aus T20 Series : ऑस्ट्रोलिया विरूद्धच्या अंतिम एकदिवशीय सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. शुभमन गिल यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केल्यानंतर आता टी-२० मालिकेच्या विजयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामने खेळले जाणार आहे. सुर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर शुभमन याच्याकडे उपकर्णधार पदाची धूरा देण्यात आलीय. तर ऑस्टेलिया संघाचे सूत्र मिचेल मार्श यांच्याकडे देण्यात आली आहेत.
ऑस्टेलिया विरुद्ध भारत हा पहिला सामना बुधवार २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरातील मानुका ओव्हल येथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस केला जाईल, तर 1 वाजून 45 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. क्रिकेटप्रेमींना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील टिव्ही चॅनेल्सवर हा सामना पाहायला मिळेल.
अभिषेक-बुमराह याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा
या मालिकेत ओपनर अभिषेक शर्मा याच्याकडून फटकेबाजीची आशा क्रिकेट चाहत्यांना आहे. अभिषेकने गेल्या वर्षभरात ओपनर म्हणून स्फोटक फलंदाजी केली आहे. त्यामुळे अभिषेककडून आशा वाढल्या आहेत. तसेच भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांकडूनही धारदार बॉलिंगची अपेक्षा आहे.
सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ
शुबमनच्या नेतृत्वात भारताला एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करता आली नाही. त्यामुळे आता सूर्याच्या नेतृत्वात भारताने कांगारुंचा धुव्वा उडवून विजयी सुरुवात करावी, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. सूर्याचा कर्णधार म्हणून हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यामुळे सूर्यासाठी ही मोठी जबाबदारी असणार आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशा प्रकारे जबाबदारी पार पाडते, क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
When you know the #AUSvIND T20I series is starting tomorrow 🥳#TeamIndia | @GautamGambhir | @surya_14kumar pic.twitter.com/1jY1oLFvI0
— BCCI (@BCCI) October 28, 2025
२९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत थरार:
पहिला टी 20- 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरा टी 20 – 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा टी 20 – 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा टी 20 – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा टी 20 – 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
भारताचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ: Ind vs Aus T20 Series
मिच मार्श (कर्णधार) ट्रॅव्हिस हेड, सीन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, ॲडम झम्पा अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ: मिच मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, सीन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झम्पा याचा या संघात समावेश असणार आहे










