Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • रांची वनडेत कोहलीचं विक्रमी शतक; 135 धावांच्या खेळीत केले अनेक रेकॉर्ड
Top News

रांची वनडेत कोहलीचं विक्रमी शतक; 135 धावांच्या खेळीत केले अनेक रेकॉर्ड

Virat Kohli celebrating after scoring a record-breaking century in the Ranchi ODI, achieving multiple cricket records

Kohli record century ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं शतक ठोकून इतिहास रचला. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच स्वरुपात सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात विराट कोहलीनं शानदार फलंदाजी केली आणि 102 चेंडूत शतक पूर्ण केलं.

विराटनं वनडे स्वरुपात ठोकलं 52वं शतक :

विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर, हे त्याचं वनडे क्रिकेटमधील 52वं शतक आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर एकाच स्वरुपात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम होता. सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं ठोकली होती. मात्र, या सामन्यात शतक ठोकून विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात विराट 120 चेंडूत 135 धावा करुन बाद झाला. त्यानं 11 चौकार आणि 7 षटकार मारले.

 

विराट कोहलीनं केला आणखी एक विक्रम :

कोहली वनडे सामन्यात घरच्या मैदानावर सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. या यादीत कोहलीनं भारतात या फॉरमॅटमध्ये 59 व्यांदा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, यासह त्यानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. सचिननं घरच्या मैदानावर वनडे सामन्यात 58 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं घरच्या मैदानावर वनडे सामन्यात 46 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगनं ऑस्ट्रेलियात वनडे सामन्यात 45 वेळा अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

हे ही वाचा : कसोटी मालिकेनंतर आजपासून वनडे मालिकेचा संग्राम; रोहित-विराट उतरणार मैदानात

रोहित आणि कोहली यांच्यात 136 धावांची भागीदारी :

सामन्यात, यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. जैस्वाल 16 चेंडूत 18 धावा करुन बाद झाला त्यानं दोन चौकार मारले. त्यानंतर विराट कोहली रोहितला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. रोहित आणि विराटनं या सामन्यात 136 धावांची भागीदारी केली. रोहित 51 चेंडूत 57 धावा करुन बाद झाला.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts