Kolkata won toss Punjab batting first : इंडियन प्रीमियर लीग 2026 (IPL 2026) च्या 12 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. या महत्त्वाच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केकेआरने दोन खेळाडूंना संघातून वगळले
केकेआरने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. नाणेफेकीच्या वेळी रहाणेने जाहीर केले की, मागील सामन्यात झेल घेताना वरुण चक्रवर्ती जखमी झाला असून त्यामुळे तो उपलब्ध नाही. सुनील नरेनलाही 11 खेळाडूंमधून वगळण्यात आले आहे. वरुण आणि नरेन यांच्या जागी रोव्हमन पॉवेल आणि सैनी यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, पंजाबने आपल्या कोणताही बदल केलेला नाही.
केकेआर आणि पंजाब यांच्यात कोणाचं पारडं जड?
आयपीएल इतिहासात केकेआर आणि पंजाब यांच्यात एकूण 35 सामने झाले आहेत. त्यापैकी केकेआरने 21 वेळा विजय मिळवला आहे, तर पंजाबला फक्त 13 वेळा यश मिळाले आहे. एक सामना निकालाशिवाय राहिला आहे. त्यामुळे आकडेवारीत कोलकात्याचा स्पष्ट वरचष्मा दिसून येतो.
पंजाब किंग्सचा आत्मविश्वास उंचावला
सध्याच्या फॉर्मनुसार पंजाब किंग्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तर केकेआरवर विजयाचे दडपण आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा केकेआरला मिळू शकतो. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत रंगतदार होणार यात शंका नाही.







