Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • मुन्नाभाई एमबीबीएस स्टाइल मध्ये स्मृति मांधानाने हटके अंदाजात केली रिंग फ्लॉन्ट; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव  
क्रीडा

मुन्नाभाई एमबीबीएस स्टाइल मध्ये स्मृति मांधानाने हटके अंदाजात केली रिंग फ्लॉन्ट; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव  

Smriti Mandhana flaunting her ring in a unique Munna Bhai M.B.B.S style gesture

smriti mandhana ring flaunt  : भारताची स्टार क्रिकेटर स्मृति मांधाना सध्या चर्चेत आहे. तिच्या चर्चेचे कारण यंदा क्रिकेट नसून तिचे रिलेशनशिप आहे. कारण स्मृति मांधाना लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया आकाऊंटवर हटके पद्धतीने तिची एंगेजमेंट झाल्याची माहिती शेयर केली. तिने तिच्या चाहत्यांना मुन्नाभाई एमबीबीएस पद्धतीने जरा हटके अंदाजात एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत चाहत्यांना माहिती दिली. तुम्हाला माहिती आहे का कोण आहे तिचा होणारा नवरा ? जाणून घ्या या लेखात. 

हे ही वाचा – The Family Man Season 3 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज; जाणून घ्या ही वेब सिरिज पहावी की नाही ?

स्मृति मांधाना लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती 23 नोव्हेंबर रोजी बॉलीवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न करणार आहे. तिने सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटिनी देखील तिच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय स्मृति मांधानाच्या सोशल मीडिया पोस्टवर तिने फ्लॉन्ट केलेली रिंग देखील सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.  2019 पासून स्मृति मांधाना आणि म्युसिक कंपोजर तथा फिल्म मेकर पलाश मुच्छल एकमेकाना डेट  करत आहे. आता ते लगंगाठ बांधणार असून त्यांनी ऑफिशली एंगेजमेंट झाल्याची घोषणा केली आहे.

 

कोण आहे पलाश मुच्छल ?

संगीतकार पलाश मुच्छल हा बॉलीवूडची सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. 2014 मध्ये पलाश मुच्छलने ‘ढिश्कियाऊं’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यासोबतच त्याने भूतनाथ रिटर्न्ससाठी देखील संगीत दिले आहे. पलाश मुच्छलचे पार्टी तो बनती है, ‘तू ही है आशिकी हे गाणे प्रचंड आहे. त्याच्या गाण्याला चाहत्यांकडून लोकप्रियता मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

अभिनय क्षेत्रातही केले काम

पलाश मुच्छल फक्त गाणे लिहिणे आणि संगीतकार इथपर्यंत मर्यादित नसून त्याने अभिनय क्षेत्रात देखील त्याचे करियर अजमावले आहे. त्याने दीपिका पदुकोण, अभिनीत आशुतोष गोवारीकर यांच्या ‘खेलें हम जी जान से’ या चित्रपटात  काम केले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts