ICC Women’s World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवशीय विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर संपूर्ण देशवाशीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षात केला जात आहे. अशात आता देशाचे पंतप्रधान उद्या या संघाची भेट घेणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतीय महिला संघाचे भरभरून कौतुक केलं आहे. “महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय. अंतिम सामन्यात खेळाडूंची कामगिरी कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. संघाने एकता आणि दृढनिश्चय दाखवला. आमच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देईल,” असं त्यांनी म्हटलं आहे.
A spectacular win by the Indian team in the ICC Women’s Cricket World Cup 2025 Finals. Their performance in the final was marked by great skill and confidence. The team showed exceptional teamwork and tenacity throughout the tournament. Congratulations to our players. This…
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2025
भारतीय महिला संघ या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मंगळवारी भारतीय महिला संघ मुंबईहून दिल्लीकडे रवाना होई. पंतप्रधान बुधवारी टीम इंडियाला भेटतील या संदर्भात बीसीसीआयला औपचारिक निमंत्रण पत्र मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, वुमन्स क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक काढण्याचा कोणताही प्लान दिसत नाही. बीसीसीआयने याबाबत अजून तरी काहीच निश्चित केलेलं नाही.
हेही वाचा – कसा राहिला टीम इंडियाचा विश्वविजयी प्रवास? लागोपाठ तीन सामने गमावल्यानंतर कोरलं विश्वचषकावर नाव
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत भारताने चढउतार पाहीले पण शेवटी जेतेपदावर नाव कोरलं. भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. श्रीलंकेला पराभूत करत स्पर्धेतील विजया घोडदौड सुरु केली. पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात सहज पराभूत केलं आणि उपांत्य फेरीच्या दिशेने कूच सुरुच ठेवली. पण तिसऱ्या सामन्यापासून भारतीय क्रिकेट संघाला सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने भारताला पराभूत केलं. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघ जागा मिळवेल की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला. पण न्यूझीलंडला पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली.
साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होता. पण पावसामुळे हा सामना झाला नाही आणि प्रत्येकी एक गुण मिळाला. उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. 338 धावा जिंकायला दिल्या होत्या. भारताच्या रणरागिणीनी आव्हान पेललं आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारताचा अंतिम फेरीतील सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौलही त्यांच्या बाजूने लागला. पण भारताने प्रथम फलंदाजी करताना 298 धावा केल्या. तसेच दक्षिण अफ्रिकेला 246 धावांवर रोखलं आणि साना 52 धावांनी जिंकला.












