South Africa World Cup final 2025 : महिला वनडे विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात झाला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना 125 धावांनी जिंकला. या विजयासह आफ्रिकन संघानं प्रथमच अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. तर इंग्लंडच्या यशाचा शेवट झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकांत 7 गडी गमावून 319 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला पूर्ण 50 षटकही फलंदाजी करता आली नाही आणि 42.3 षटकांत 194 धावांवर सर्वबाद झाले. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
आफ्रिकेचा धावडोंगर :
उपांत्य सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. लॉरा वोल्वार्डनं एका टोकाला धरुन फलंदाजी केली आणि 143 चेंडूत 20 चौकार आणि 4 षटकार मारत 169 धावांची जबरदस्त खेळी केली. तिनं सामन्यात 45 धावा काढणाऱ्या तझमिन ब्रिट्ससोबत पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. पहिली विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव काहीसा डळमळीत झाला. एकावेळी संघानं 202 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. तिथून कर्णधार लॉरा वोल्वार्डची खेळी संघासाठी तारणहार ठरली. तिच्या खेळीमुळं दक्षिण आफ्रिकेला केवळ उच्चांक गाठता आला नाही तर एक संस्मरणीय खेळीही निश्चित झाली. वोल्वार्ड डावाच्या 48व्या षटकात बाद झाली. गोलंदाजीच्या बाबतीत, सोफी एक्लेस्टोन इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिनं 10 षटकात 44 धावा देत चार विकेट घेतल्या, तर लॉरेन बेलनं दोन विकेट घेतल्या.
South Africa storm into the #CWC25 final 👏🇿🇦 pic.twitter.com/hU9nEPIsJX
— ICC (@ICC) October 29, 2025
इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशी :(South Africa World Cup final 2025)
320 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. संघाचे तीन अव्वल फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. दोन फलंदाज शून्य धावांवर आणि तीन फलंदाज एक धावांवर बाद झाले. येथून पुनरागमन करणं संघासाठी अत्यंत कठीण वाटत होते. मात्र नॅट सीवर ब्रंट आणि अॅलिस कॅप्सी यांनी चौथ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी करुन काही आशा निर्माण केल्या. मात्र कॅप्सी आणि ब्रंट बाद झाल्यानंतर इंग्लंड लवकरच बाद झाला. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. कॅप्सीनं 50 धावा केल्या, तर नॅट सीवर ब्रंट 64 धावा करुन बाद झाली. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझानं कॅपनं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या












