नवी दिल्ली : 2026 मध्ये होणारं आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत आयोजित केलं जाणार आहे. ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होतील. काही संघ मुख्य स्पर्धेसाठी आधीच पात्र झाले होते, तर काहींना प्रादेशिक पात्रता फेरीत खेळून मेगा इव्हेंटमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी मिळाली. यापैकी 17 संघ ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत अंतिम करण्यात आले होते, तर उर्वरित तीन संघ आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीतून निश्चित होणार होते. यापैकी दोन संघांची नावं अंतिम करण्यात आली आहेत, ज्यामुळं मेगा इव्हेंटसाठी एकूण 19 संघ निश्चित झाले आहेत. यापैकी एक भारताचा शेजारी देश नेपाळ आहे.
नेपाळ आणि ओमान संघ पात्र :
आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरीत, नेपाळ आणि ओमान दोघांनीही ग्रुप स्टेजनंतर सुपर सिक्स फेरीत चांगली कामगिरी केली. नेपाळनं सुपर सिक्स फेरीत तीन सामने खेळले, त्यात तिन्ही जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवलं आणि 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र झाला. नेपाळनं 2024 च्या टी-20 विश्वचषकातही आपलं स्थान निश्चित केलं, परिणामी ते आता या स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी होणार आहेत. नेपाळ व्यतिरिक्त, ओमाननंही सुपर सिक्स फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं, त्यांचे तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळवलं आणि टी-20 विश्वचषकात आपलं स्थान निश्चित केलं.
Oman punch their ticket to next year’s ICC Men’s #T20WorldCup 🎟️
More ➡️ https://t.co/6k9k6Roo9t pic.twitter.com/bZ0kjf25iS
— ICC (@ICC) October 15, 2025
कॅनडा आणि इटलीही स्पर्धेत सहभागी :
विशेष म्हणजे फुटबॉलप्रीय असलेल्या इटलीनं 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी देखील पात्रता मिळवली आहे. दरम्यान, नामिबिया आणि कॅनडानंही दमदार कामगिरी करत विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. सध्या 20 पैकी एकूण 19 संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत, एका स्थानासाठी अद्याप लढत बाकी आहे.
हे ही वाचा : महिला विश्वचषकात इंग्लंड-पाकिस्तान सामना पावसात; पाकिस्तानने गुणतालिकेत खातं उघडलं
एक स्थानासाठी तीन संघ :
2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी 19 संघांची निवड झाली असली तरी, फक्त एक स्थान रिक्त आहे, यासाठी तीन संघ स्पर्धेत आहेत. आशिया-पूर्व पॅसिफिक पात्रता फेरी पाहता, युएई, जपान आणि कतार यांना सुपर सिक्स पॉइंट टेबलमध्ये पोहोचण्याची संधी आहे, ज्यामुळं त्यांचे शेवटचे उर्वरित सामने सर्व संघांसाठी महत्त्वाचे आहेत. जर युएईनं जपानविरुद्धचा सामना जिंकला तर ते मेगा स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करतील.