Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का; शुभमन गिल सामन्यातून बाहेर, कोण होणार नवा कॅप्टन?
क्रीडा

आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का; शुभमन गिल सामन्यातून बाहेर, कोण होणार नवा कॅप्टन?

Shubman Gill ruled out before the second Test against Africa, Team India faces setback

Shubman Gill Out Second Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्याआधी, एक नवीन अपडेट समोर आलं आहे. बऱ्याच काळापासून जे अपेक्षित होतं ते अखेर घडलं. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. गिलच्या अनुपस्थितीनंतर ऋषभ पंत गुवाहाटी कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल.

शुभमन गिल पहिल्या कसोटीत जखमी :

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळं तो दुसऱ्या डावात फलंदाजी करु शकला नाही. गिल दुसरी कसोटी खेळू शकणार नाही असा अंदाज आधीच लावला जात होता. आता बीसीसीआयच्या अधिकृत अपडेटनं याची पुष्टी झाली आहे. गुरुवारी इतर भारतीय खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले असताना, गिलनं सराव केला नाही असे कळले. तेव्हाच गिलचा सहभाग आता जवळजवळ अशक्य असल्याचं स्पष्ट झालं.

 

गिलला संघातूनही वगळलं :

शुभमन गिल केवळ दुसरी कसोटी खेळू शकणार नाही, तर त्याला संघातूनही वगळण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीच्या एक दिवस आधी शुभमन गिल आता खेळणार नाही हे निश्चित झालं होतं, म्हणून त्याला निघून जाण्यास सांगण्यात आलं. तो आता डॉक्टरांचा सल्ला घेईल आणि शक्य तितक्या लवकर उपचार घेईल. ऋषभ पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करेल, यापूर्वी पाच टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.

वनडे मालिकेबाबतही होणार निर्णय :

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका कसोटीनंतर खेळवली जाईल याबद्दलही तणाव आहे. सध्या गिल केवळ कसोटीतच नव्हे तर वनडे सामन्यांमध्येही टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. जर गिल बरा झाला नाही तर बीसीसीआयला तिथंही नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागेल. या बाबींबाबत बीसीसीआय काय निर्णय घेतं हे पाहणं बाकी आहे. आता शुभमन गिलच्या पुनरागमनाचा प्रश्न आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts