विशाखापट्टणम :
भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनं पराभव करून तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. विशाखापट्टणममध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर २७१ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतानं हे लक्ष्य ३९.५ षटकांत पूर्ण करून सहज विजय मिळवला. या विजयामुळं भारतानं तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. विराट कोहलीनं संपूर्ण मालिकेत टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली आणि तीनपैकी दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावली.
𝗪.𝗜.𝗡.𝗡.𝗘.𝗥.𝗦 🏆
Congratulations to #TeamIndia on clinching the 3⃣-match ODI series against South Africa by 2-1 🥳
Scorecard ▶️ https://t.co/HM6zm9nzlO#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Lv1CM9z0bQ
— BCCI (@BCCI) December 6, 2025
आफ्रिकेची प्रथम फलंदाजी :
या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकनं सर्वाधिक १०६ धावा केल्या, तर कर्णधार टेम्बा बावुमानं ४८ धावा केल्या. डी कॉक आणि बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. दोघे बाद झाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला ३०० च्या खाली बाद केले. डी कॉक आणि बावुमा व्यतिरिक्त, डेवाल्ड ब्रेव्हिसनं २९, मॅथ्यू ब्रिएट्झकेनं २४, मार्को जॅन्सेननं १७ आणि कॉर्बिन बॉशने नऊ धावा केल्या. केशव महाराज २० धावांवर नाबाद राहिले. कुलदीप आणि प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येकी चार बळी घेतले.
जैस्वालचं शतक, रोहितचं अर्धशतक :
लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडियाला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यामुळे शानदार सुरुवात मिळाली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावा जोडल्या. रोहित शर्मा ७३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेला फलंदाज विराट कोहली क्रीजवर आला. विराटनं या सामन्यात आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला आणि ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर विराट आणि जैस्वाल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी झाली आणि दोन्ही फलंदाज सामना नाबाद राहिला. जयस्वाल १२१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह ११६ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, कोहलीने ४५ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची शानदार खेळी केली.







