ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने १६ जानेवारी २०२५ रोजी हिमाचल प्रदेशात टेनिसपटू व स्पोर्ट्स मॅनेजमेंट तज्ज्ञ हिमानी मोरसोबत विवाह केला. विवाहानंतर हिमानीने व्यावसायिक टेनिसला निरोप देत अमेरिकेत मिळालेल्या तब्बल १.५ कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफरही नाकारली. उच्च शिक्षण घेतलेली हिमानी आता वैयक्तिक आणि उद्योजकीय वाटचालीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.












