Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • झिम्बाब्वेचा श्रीलंकेला दे धक्का; विश्वविजेत्या संघाचा 67 धावांनी धुव्वा
क्रीडा

झिम्बाब्वेचा श्रीलंकेला दे धक्का; विश्वविजेत्या संघाचा 67 धावांनी धुव्वा

Zimbabwe cricket team celebrating after defeating Sri Lanka by 67 runs

Zimbabwe beats Sri Lanka : पाकिस्तानमध्ये सध्या तिरंगी मालिका सुरु आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे क्रिकेट संघ सहभागी आहेत. झिम्बाब्वेनं 2009 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या श्रीलंकेचा मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 162 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ फक्त 95 धावांतच गारद झाला आणि सामना 67 धावांनी गमावला.

सिकंदर रझाची आक्रमक फलंदाजी :

झिम्बाब्वेकडून ब्रायन ब्रेनेटनं सर्वाधिक 49 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझानंही 32 चेंडूत 47 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रायन बर्लनंही 18 धावा केल्या. या खेळाडूंनी झिम्बाब्वेला 162 धावांचा सन्मानजनक आकडा गाठण्यास मदत केली. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगानं चार षटकांत 27 धावांत तीन बळी घेतले. इशान मलिंगानंही चार षटकांत 27 धावांत 2 बळी घेतले. महेश थिकशाना आणि दुष्मंथा चामीरा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, ते झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव आणू शकले नाहीत.

 

श्रीलंकेची फलंदाजी सपशेल अपयशी :

यानंतर, श्रीलंकेच्या संघातील कोणत्याही फलंदाजानं चांगली कामगिरी केली नाही, ज्यामुळं संघाचा पराभव झाला. फक्त दासुन शनाका आणि भानुका राजपक्षे यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. उर्वरित खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. शनाकानं 25 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. राजपक्षेनं 18 चेंडूत 11 धावा केल्या, ज्यामध्ये एक चौकार होता. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं संघ 20 षटकांत 95 धावांवर मर्यादित राहिला.

हे ही वाचा : बहुप्रतिक्षीत अ‍ॅशेस मालिका उद्यापासून होणार सुरु

सिकंदर रझा सामना वीर :

झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सनं चार षटकांत 9 धावा देत तीन विकेट घेतल्या. रिचर्ड नगारावानं दोन विकेट घेतल्या. सिकंदर रझानं एक विकेट घेतली आणि त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील तिसरा सामना उद्या 22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमध्ये रावळपिंडी इथं होणार आहे. तत्पुर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा 5 विकेटनं पराभव केला होता.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts