Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देणार? सुनेत्रा पवार भावूक, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धाडसी निर्णय…
Pune

पुण्यातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देणार? सुनेत्रा पवार भावूक, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धाडसी निर्णय…

Ajit Pawar | पुणे (Pune) शहरात वाहतूक कोंडीचा (Traffic) त्रास पुणेकरांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. पुणेकर दररोजच्या वाहतूक कोंडीला त्रस्त झाले होते. त्यामुळे थोडाफार का होईना वाहतूक कोंडीचा हा त्रास कमी व्हावा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) उपस्थित होते.

हेही वाचा – स्पीडचा थरार अन् अपघात! इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत बिग बॉस स्पर्धकाने उचलले टोकाचे पाऊल

या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी या पुलाला अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर यावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

अजित पवारांबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

नुकतचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी मुरलीधर मोहोळ यांनी या पुलाला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली. या उड्डाणपुलाचा पाठपुरावा अजित दादांनी अतिशय आक्रमकपणे केला होता. त्याची संकल्पना देखील अजित दादांनी पाहिली होती. त्यांच्या दूरदृष्टीतून हा पूल आकाराला आला आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील या पुलाला अजित दादांचे नाव देण्यात यावे अशी सर्वांची इच्छा आहे, असं मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाले.

मुरधीर मोहोळ यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “हा पूल उभारण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. जुना पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याचा धाडसी निर्णय अजित दादांनीच घेतला होता. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन हे काम पूर्ण केले होते. तसेच हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना आहे आणि आधुनिकतेला शोभणारा आहे. त्यामुळे अजित पवारांचे नाव या पुलाला देण्यास माझे पूर्णपणे समर्थन असून निश्चितपणे त्यांचे नाव आम्ही देऊ. तसेच बेंगळुरू सारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून पुण्यात रिंग रोड आणि भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी अजित दादांनी नेहमी प्रयत्न केले होते, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अजित दादांनी अनेकदा वाईटपणा पत्करला…, सुनेत्रा पवार भावूक

पुलाला अजित पवारांचे नाव देण्यास फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. तसंच या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली. “जुना पूल पाडण्याचा आणि त्याजागी नवा पूल बांधण्याचा धाडसी निर्णय घेत अजित दादांनी अनेकदा वाईटपणा पत्करला होता. पण पुणेकरांच्या हितासाठी आणि पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ते स्वत: लक्ष देऊन काम करत होते. आज पूलाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. तसेच अजित दादांनी पुणे शहरासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.

महिला दिनाचे औचित्य साधत आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ हे देखील उपस्थित होते. तर आज लोकार्पण केलेल्या पुण्यातील या दुमजली उड्डाणपुलामुळे पाषाण, बाणेर आणि विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts