Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • युद्ध पेटलं! अफगाणिस्तानचा थेट इस्लामाबादवर एअर स्ट्राईक, पाकच्या 55 सैनिकांचा मृत्यू
Top News

युद्ध पेटलं! अफगाणिस्तानचा थेट इस्लामाबादवर एअर स्ट्राईक, पाकच्या 55 सैनिकांचा मृत्यू

Afghanistan Air Force Strike On Islamabad | सध्या अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) युद्ध चांगलंच पेटलं आहे. पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकचा (Air Strike) बदला म्हणून अफगाणिस्तानने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर (Islamabad) हवाई हल्ले करत प्रत्युत्तर दिलं आहे. अफगाणिस्तानच्या हवाई दलानं सकाळी 11 च्या सुमारास हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – एअर स्ट्राईकचा हिशोब चुकता! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर जोरदार पलटवार, पाकची 15 लष्करी ठिकाणे ताब्यात

अफगाणिस्तानचा इस्लामाबादवर हल्ला

या हल्ल्याबाबत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याचे लक्ष्य पाकिस्तानचे तळ होते. तसंच अफगाण विमानांनी इस्लामाबादमधील फैजाबाद शहाराजवळील एका मिलिटरी कॅम्पवर बॉम्बफेक केली. त्यानंतर त्यांनी अबोटाबाद आणि नौशेरा येथील लष्करी तळांना लक्ष्य केलं.

काल पाकिस्तानने काबूल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ला केला होता, त्याचाच हा बदला असल्याचं अफगाणिस्तानने म्हटलं आहे. जमरूद मिलिटरी कॉलनीवरही अफगाणिस्तानने हल्ले केले आहेत. हे हवाई हल्ले ड्रोनद्वारे केल्याचे सांगितले जात आहे.

अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला बसला मोठा फटका

दरम्यान, हवाई हल्ल्यांसोबतच अफगाणिस्तानने जमिनीवरील युद्धातही मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. यामध्ये पाकिस्तानला मोठा फटका बसला असून ड्युरंड लाईनवर झालेल्या चकमकीत 55 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर पाकिस्तानच्या दोन लष्करी मुख्यालयांसह 19 चौक्यांवर तालिबानने कब्जा मिळवला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts