Afghanistan vs Pakistan | सध्या अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तामध्ये (Pakistan) युद्धाचा जोरदार भडका उडाला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांवर एअर स्ट्राईक (Air Strike) केले आहेत. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये जोरदार तणावाचे वातावरण दिसत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांना टार्गेट केले आहे. यामध्ये काबूल (Kabul), पक्तिया (Paktia) आणि कंधार (Kandhar) येथील मुख्य अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करून पाकिस्तानने हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पाकच्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबान सरकारनं प्रतिवार करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा – लढाईचा भडका उडाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला; काबूल, कंधारसह अनेक शहरांवर केले एअर स्ट्राईक
अफगाणिस्तानचा पाकच्या 15 ठिकाणांवर ताबा
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या 15 लष्करी ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. तसेच अफगाणिस्तानच्या सैन्यानं कुनार-बाजौर आणि नंगरहार-खैबर या सीमेवर मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला मोर्टार, टँक, रॉकेट आणि आर्टिलरी याचा वापर करत करण्यात आला आहे. अफगाणिस्ताननं केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
अफगाणिस्ताननं पाकिस्तान विरूद्ध ऑपरेशन 201 खालिद बिन वालिद ब्रिगेड आणि 205 अल बद्र ब्रिगेड मिशन राबवलं आहे. तर अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबील्लाह मुजाहिद म्हणाले की, पाकिस्ताननं आमच्या सर्वसामान्य नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आमच्या सैन्यानं पाकच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत.











