Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एका ट्विटने खळबळ! अजित पवार विमान अपघात कनेक्शन, भोंदूबाबा खरातपर्यंत
Top News

एका ट्विटने खळबळ! अजित पवार विमान अपघात कनेक्शन, भोंदूबाबा खरातपर्यंत

Ajit Pawar Plane Crash Connection

Ajit Pawar Plane Crash Connection : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari’s Tweet) यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकारणात भोंदू बाबा अशोक खरात याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी एक ट्विट करत एकच खळबळ उडवून दिलीय. त्याचबरोबर अजितदादा विमान अपघात (Ajit Pawar’s Accident) आणि भोंदूबाबा खरात हे कनेक्शन  (‘Bhondu Baba’ Kharat Connection) कसं जुळवून आलंय याचे स्पष्टीकरण दिलीय.

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. हाच धागा पकड अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात अशोक खरात याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे, अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते

‘या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री, व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते.अशा थोतांडाना थारा देत नव्हते.

अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झालंय

मात्र, या प्रकरणात अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय..’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

भोंदुबाबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? – रोहित पवार

तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. ‘नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे.’ अशी मागणी रोहित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या ट्विटचा संदर्भ देऊन केली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts