अमरनाथ यात्रा 2025 सोमवार रात्री अधिकृतपणे स्थगित करण्यात आली आहे. जम्मू जिल्हा प्रशासनाने शहरातील प्रमुख फॅसिलिटेशन सेंटरवर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. दिल्लीतील राजकीय हालचाली आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळण्याच्या चर्चांदरम्यान हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सलग बैठक घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












