US-Iran War | अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव कमी होत नाहीये. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहेत. आताही अमेरिकेने इराणवर मोठा भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान (Isfahan) येथील एका मोठ्या दारूगोळ्याचा गोदामाला टार्गेट केले होते.
2,000 पौंड वजनाचे बॉम्ब टाकत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला
अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 2,000 पौंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बसह इतर अनेक धक्कादायक बॉम्ब वापरण्यात आले होते. अमेरिकेने केलेले हे हल्ले इतके भीषण होते की सगळीकडे आगीचा भडका उडाला होता. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथसोशल’वर या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इस्फहान शहरातील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामावर अमेरिकेने 2,000 पौंडांचे बंकर-बस्टर बॉम्ब टाकत मोठा हल्ला केला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडीओ ‘ट्रूथ सोशल’वर शेअर केला आहे. या व्हिडीओत रात्रीच्या आकाशात अनेक स्फोट होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्रत्यक्ष हल्ला कसा झाला हे दाखवतो आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक दारूगोळा वापरण्यात आला होता. ज्यामुळे इस्फहानमदील भूमिगत आणि तटबंदी असलेल्या अनेक ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे.इस्फहान हे इराणमधील प्रमुख शहर आहे. अमेरिकेने आता या शहरावर हल्ला केल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. तर अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यानंतर आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. या तिन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्यापही हे तिन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे.











