Arvind Sawant | मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतील (Shivsena) 8 खासदार हे एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. तर आता एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी असून ते तिथून ऑपरेशन टागर राबवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटातील खासदार खरच एकनाथ शिंदेंच्या सेनेत जाणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “यांचा हिशोब होईल…”, लेबनान हल्ल्यानंतर मिया खलीफा भावूक; अमेरिकेसह इस्रायलवर केले गंभीर आरोप
ठाकरे गटातील 8 खासदार शिंदे गटात जाणार?
ठाकरे गटातील आठ खासदार हे एकनाश शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आठ खासदारांमध्ये अरविंद सावंत यांचंही नाव घेतलं जात आहे. तर याबाबत आता अरविंद सावंत यांनी स्वत: दिल्लीत पत्रकार परिषदत घेत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांवरही जोरदार आगपाखड केली.
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले?
प्रसार माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, ठाकरे गटातून शिंदेच्या गटात कोण कोणते आठ खासदार जाणार आहेत. या आठ खासदारांमध्ये माझापण फोटो आहे. तुम्ही कालपर्यंत माझ्या सहकार्यांची नावं देत होता आणि आता माझाही फोटो दिला आहे. नशीब आमचं की तुम्ही अनिल देसाईंचं नाव घेतलं नाही. देशातील जनतेनं हे लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. मी या बातमीचा कडाडून निषेध करतो, असं सावंत म्हणाले.
एक लक्षात ठेवा सर्वांनी मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. जर मला शिंदेंच्या पक्षाचा कॉल आला असेल किंवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. मी कधीही मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या पक्षाचा शिवसैनिक आहे. मी कधीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यांच्या एका फॉन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बाळासाहेब ठाकरेंनी मला आमदार केलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी मला खासदार केलं आहे. आम्ही आमच्या पक्षासोबत आयुष्यभर निष्ठावंत राहिलो आहोत. आम्ही भगवा घेऊन आलो आहोत आणि जाताना तो पांघरूण जाऊ, असं अरविंद सावंत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सध्या प्रत्येक खासदार हा ज्याच्या त्याच्या कामात आहे. तसेच येत्या 24 तारखेला शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोण कोणाच्या गटात जाणार, अशा बातम्या सोडा. विकत घेणारी आणि विकली जाणारी माणसं कोण आहेत ते तुम्ही ओळखा. पन्नास खोके एकदम ओके असं कोण म्हणालं होतं? त्या लोकांनी जाहीर सभेत कबुल केलं ना. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी ही गोष्ट कबूल केली ना. ते जरी तसे असले तरी आम्ही विकली जाणारी औलाद नाही, अशी सनसनीत प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.












