Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • खळबळजनक! ढोंगीबाबा अशोक खरातने पुरूषांनाही नाही सोडलं; रिंगण आखून केलं धक्कादायक कृत्य
Top News

खळबळजनक! ढोंगीबाबा अशोक खरातने पुरूषांनाही नाही सोडलं; रिंगण आखून केलं धक्कादायक कृत्य

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता संपूर्ण जगासमोर आला आहे. अशोक खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. त्याने विवाहित महिला आणि तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. नराधम खरातला अटक केल्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे उघडकीस येताना दिसत आहेत. आताही या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – होर्मुज सामुद्रधुनी बंद करणाऱ्या इराणच्या IRGC नौदल प्रमुखाचा मृत्यू; इस्रायलचा मोठा दावा

अशोक खरातने महिलांसोबतच पुरूषांचीही मोठी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. ढोंगीबाब अशोक खरात आता तब्बल 5 कोटींच्या खंडणीप्रकरणामध्ये अडचणीत आला आहे. अंधश्रद्धा, काळी जादू आणि मृत्यूची भीती या गोष्टींचा आधार घेत खरातने कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

ढोंगीबाबा अशोक खरातने व्यावसायिकाला घातला तब्बल 5 कोटींचा गंडा

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. काळी जादू करत आणि मृत्यूची भीती दाखवत तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी उकळल्याचा आरोप व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी केला आहे.

व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, व्यवसायात यश मिळावं म्हणून तक्रारदार व्यावसायिक त्याच्या एका मित्राच्या मदतीनं ढोंगी खरातकडे गेला होता. त्यानंतर खरातने अवतार पूजा करण्याचा सल्ला व्यावसायिकाला दिला होता. ही पूजा करण्याआधी खरातने त्याला मृत्यूची भीती दाखवत त्याच्याकडून मर्सिडीज कार खरेदी करून घेतली. एवढंच नाही तर परिसाची शक्ती मिळवण्यासाठी तब्बल 21 देश फिरावं लागेल, अशी भीती त्याला घातली. तसेच मिरगावमधील मंदिरात सापाचा चमत्कार दाखवून नागदेवतेचा कोप होईल असं सांगितलं. अशाप्रकारे पूजा, परदेश दौरे, औषधोपचार या सगळ्याचा खर्च खरातने तक्रारदाराकडूनच करून घेतला

खरातने ईशानेश्वर मंदिराच्या मागे तक्रारदाराभोवती रिंगण आखून व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवत त्याला अक्षरश: कैद करून ठेवलं होतं. त्यानंतर त्याच्यावर मानसिक दबाव आणत त्याला भीती, अंधश्रद्धा दाखवत त्याला तब्बल 5 कोटींचा गंडा घातल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच खरातने त्याच्या मिरगावमधील फार्महाऊसच्या बांधकामाचा खर्च आणि त्यातील फर्निचरचाही खर्च त्याने जबरदस्तीने वसूल केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.

आपल्याला अशोक खरात फसवत असल्याचं लक्षात येताच व्यावसायिकानं आपली मर्सिडीज कार आणि पैसे त्याला परत मागितले. मात्र, खरातने हे सर्व परत करण्यास नकार देत त्याला धमकावलं होतं. तर या प्रकरणी आता पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास SIT कडून केला जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts