Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशोक खरातने अनेक विवाहित महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, बड्या उद्योजकांसोबत जवळचे संबंध होते. तर याच प्रसिद्धीचा फायदा घेत खरातने अनेकांना लुबाडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या प्रकरणी खरात पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा – सुनेत्रा पवारांविरोधात 55 उमेदवार मैदानात; कोण कुठल्या पक्षातून? अंतिम यादी समोर
अशोक खरातची अकड अजूनही कमी नाही?
अशोत खरात प्रकरणात दररोज नवनीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आताही या प्रकरणातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याची अकड अजूनही कमी झाली नसल्याचं समोर आलं आहे.
चौकशीदरम्यान खरात नेमकं काय म्हणाला?
सध्यो पोलीस अशोक खरातची चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान ढोंगी खरातने धक्कादायक विधान केले आहे. चौकशीदरम्यान अशोक खरातने अत्यंत अहंकारात दुनिया झुकती है, सिर्फ झुकानेवाला चाहिए, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्याच्या या विधानानंतर त्याचा माज अजूनही कमी झाला नसल्याचं दिसत आहे.
स्वत:ला निर्दोष करण्यासाठी खरातने अनेक विचित्र वक्तव्ये देखील केली आहेत. मी कसलाही चमत्कार केलेला नाही. मी फक्त हातचलाखी वापरून आणि विज्ञानातील काही ट्रिक वापरून लोकांना गंडवले आहे. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या मनात फक्त भीती निर्माण केली होती, असा दावा खरातने केला आहे. यावेळी खरातच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून येत नव्हता. त्यामुळे अजूनही खरातची अकड कमी झाली नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. याच ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.











