Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अ‍ॅशेस मालिका: ऑस्ट्रेलियानं दोनच दिवसांत जिंकला पहिला सामना; हेडच्या वादळी खेळीत इंग्लंडचा धुव्वा
Top News

अ‍ॅशेस मालिका: ऑस्ट्रेलियानं दोनच दिवसांत जिंकला पहिला सामना; हेडच्या वादळी खेळीत इंग्लंडचा धुव्वा

Australia vs England First Match

Ashes series : अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघात पर्थ इथं खेळवण्यात आला. हा सामना दुसऱ्या दिवशी संपला, ज्यात ऑस्ट्रेलियानं 8 विकेट्सनं विजय मिळवला. इंग्लंडनं यजमानांसाठी 205 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ट्रॅव्हिस हेडच्या धमाकेदार खेळीमुळं ऑस्ट्रेलियानं त्याचा यशस्वी पाठलाग केला. यासह आता यजमान कांगारुंनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हेडनं केवळ 69 चेंडूत शतक केले, जे अ‍ॅशेसच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद शतक आहे.

हेही वाचा – अमेरिकान खेळाडूला ICC नं केलं सस्पेंड; कारण काय?

हेडनं मारले 16 चौकार आणि 4 षटकार :

ट्रॅव्हिस हेडनं त्याच्या डावात 83 चेंडूत 123 धावा केल्या. त्याच्या डावात 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता, ज्यामुळं इंग्लंडचा बॅझबॉल दृष्टिकोन मोडून काढला. हेडनं फक्त 69 चेंडूत त्याचं शतक पूर्ण केलं, जे अ‍ॅशेसच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद शतक आहे. त्याच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलियाला 205 धावांचा पाठलाग सहज करता आला. सुरुवातीला हेडनं वेदरलँडसोबत 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यानं लॅबुशेनसोबत 117 धावांची भागीदारी केली आणि संघाचा विजय निश्चित केला.

सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला :

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मात्र, त्यांचा डाव 172 धावांवर आटोपला. हॅरी ब्रूक हा एकमेव फलंदाज होता ज्यानं अर्धशतक केलं, तर चार फलंदाज त्यांचं खातंही उघडू शकले नाहीत. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फलंदाजीला आला तेव्हा ही कसोटी एका रोमांचक वळणावर पोहोचली. बेन स्टोक्सनं गोलंदाजीत कहर केला, त्यानं पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाला केवळ 132 धावांवर रोखलं आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मात्र इंग्लंडचा दुसरा डाव आघाडीनं सुरु झाला तरीही त्याची सुरुवात चांगली झाली नाही. क्रॉलीला त्याचं खातं उघडता आलं नाही. स्टार्कनं पुन्हा त्याची विकेट घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडनं 164 धावा केल्या. स्टार्कनं या डावात तीन विकेट घेतल्या, म्हणजेच त्यानं सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts