सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांचा फैर झाडल्या जात आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. असे असताना सध्या राज्यात महायुती म्हणून सरकारमध्ये एकत्र असलेल्या भाजप-शिवसेना पक्षातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. कणकवलीत शिवसेना आमदार निलेश राणे यांंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन धाड टाकत एक प्रकारे स्टिंग ऑपरेशनच राबवलं आहे. त्यामुळं आता भाजपचे आमदार नितेश राणे हे या वादात उडी घेतात का हे पाहाणं महत्त्वाच ठरणार आहे.
हेही वाचा – मतदारांची पार लायकीच काढली! “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं”; मंत्र्याचं खळबळजनक विधान
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून महायुती आणि महाविकास आघाडी मधील सर्वच पक्ष काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे येथील प्रचाराची धुरा आमदार निलेश राणे यांच्यावर देण्यात आलेली आहे. तर भाजपच्या प्रचाराची धुरा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत निलेश राणे यांनी निवडणूक अधिकारी, पोलिस प्रशासन आणि स्वत: जाऊन भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असून पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत
निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे.. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं, असं राष्ट्रवादी शदर पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आ. निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे.. यात कोणतीही चाणक्य…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 26, 2025
आशिष शेलार यांनी निलेश राणे यांचे आरोप फेटाळून लावले
दरम्यान दुसरीकडे मात्र हे पैसे आपल्या व्यावसायाचे असल्याचा दावा या भाजप पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील निलेश राणे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही माहिती खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलेश राणे यांनी थेट या भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून हा व्हिडीओ काढला आहे. निवडणुकीसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे या कार्यकर्त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आपल्या बिझनेसचे पैसे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दमदार नेतृत्व 👑💥
ह्यांची मस्ती अशीच जिरवा 💥💥💥
मालवण नगरपालिका निवडणूक दरम्यान राणे साहेबांचा मोठा धमाका 👑
आमदार निलेश राणेंची मालवणात धाड…
भाजप पदाधिकाऱ्याचा घरात सापडलं पैशाचं घबाड…💥✨🌟@meNeeleshNRane
जबरदस्त साहेब 👑❤️ pic.twitter.com/lYksZp7oY0— कोकणचा वारसा 🌊🐟🦀 (@Mayazayo) November 26, 2025
असा घडला सर्व प्रकार..
मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार होती, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी आता थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केलं आहे. निलेश राणे यांना या भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग आढळून आली आहे. त्यानंतर निलेश राणे हे अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील काढला आहे. एवढंच नाही तर आणखी पैशांच्या तीन ते चार बॅगा असल्याचा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली असून, आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.












