बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा मार्गावर खडकी फाट्याजवळ आज एक दुर्दैवी अपघात घडला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस बुलढाणा वरून मोताळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला बसने जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.