राज्यात सध्या पार पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आज रात्री १० वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यास बंदी घाण्यात आली आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलं आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आयोगानं स्पष्ट केलंय.
रात्री 10 वाजता प्रचार संपेल नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबरला रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही.
हेही वाचा – शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार; संजय राऊंत बाॅम्ब
संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला
‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २ डिसेंबर २०२५ रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, असं राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केलं आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित… pic.twitter.com/WZYTGYnZe7
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) November 30, 2025
प्रशासनाची करडी नजर
सोमवारी प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनेक ठिकाणी पैसे वाटपाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळं उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठीही यंत्रणा गतिमान केली आहे. त्यानुसार गठ्ठा मतदान असणाऱ्या ठिकाणावर अधिक भर दिला जात आहे. पैशांसह भेटवस्तू, कुपन आदींचे वाटपही काही ठिकाणी सुरू आहे, त्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अखेरच्या दिवशी मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं प्रशासनही सज्ज झालं असून, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकरिता सतर्क राहण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागासह शहरातील रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. संशयास्पद हालचालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.






