आज सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने 10 वी आणि 12 वी च्या बोर्ड परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 17 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन CBSC ने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सुयोग्य नियोजन करण्यास मदत होईल. तसेच CBSC कडून पालकांसाठी देखील महत्वपूर्ण मुद्दे दिले आहे. त्यानुसार पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नियोजन करण्यास फायदा होईल.
येणाऱ्या वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षांसाठी भारतासह २६ विविध देशांमधून सुमारे ४५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती ‘सीबीएसई’ ने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
हे आहेत पालकांसाठी ठळक मुद्दे
- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन CBSC बोर्डाने 10 वी आणि 12वी परीक्षेसाठी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
- मागच्या वर्षी प्रमाणेच 10 वीच्या परीक्षा दोन टप्प्यात होणार
- 10 वीच्या परीक्षांचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत होईल.तर 10वीच्या परीक्षांचा दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे 2026 दरम्यान होईल.
- 12 वी ची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे.
- 12 वी च्या प्रॅक्टिकल परीक्षा: जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये होतील.
- 10वीसाठी प्रवेशपत्रे (admit cards) फेब्रुवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून दहावीसाठी दोन परीक्षा होणार असल्याने, दुसरी परीक्षा १५ मेपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. या सर्व परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक ‘सीबीएसई’ने नुकतेच जाहीर केले.
‘सीबीएसई’ ने विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ‘सीबीएसई’ ची दहावीची परीक्षा २०२६ पासून वर्षातून दोन वेळा होईल, असे सांगण्यात आले होते. आता या दुसऱ्या परीक्षेसह दहावीच्या पहिल्या आणि बारावीच्या परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा नऊ मार्च रोजी संपणार असून, बारावीची परीक्षा नऊ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परीक्षेतील शेवटचा पेपर झाल्यानंतर १० दिवसांनी त्याच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू होणार असून, त्यापुढील १२ दिवसांत ते पूर्ण केले जाणार आहे.