Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सावधान! घरातून बाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेचा उद्या या मार्गावर मेगाब्लाॅक
Mumbai

सावधान! घरातून बाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेचा उद्या या मार्गावर मेगाब्लाॅक

Central Railway Megablock

Central Railway Megablock : मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी एकादा या मेगाब्लाॅकवर नजर टाका, अन्यथा तुमचा दिवस आणि वेळ वेस्ट होईल. उद्या रविवारी मध्य रेल्वेचा मुंबई विभागात मेगाब्लाॅक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराच्या बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मेगाब्लाॅकमुळे मुंबई लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. त्यामुळे तुमचा वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. अति महत्त्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे.

मुलुंड आणि ठाणे सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीमा मार्ग असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०४ वा. ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाणे स्थानकावरुन पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल फेऱ्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही वाचा – पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांचे व्याख्यान, विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध, वादाची ठिणगी पडली

लोकल ट्रेन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे गंतव्य स्थानकावर उशिराने

कल्याण येथून १०.३६ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल ट्रेन ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड स्थानकावरून पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल ट्रेन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे गंतव्य स्थानकावर उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.

हार्बर मार्ग बंद

पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन मार्ग पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन लोकल ट्रेन सकाळी १०.३३ वा. ते दुपारी ३.४९ वा. पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर-पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन फेऱ्या सकाळी ९.४५ वा. ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्ग बंद

पनवेल- ठाणे अप आणि डाऊन पनवेल सकाळी ११.०२ वाजता ते दुपारी १५.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ वाजता ते दुपारी १५.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या रद्द राहतील.

स्पेशल ट्रेन

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts