Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • CET Cell : बीएड परीक्षेत तांत्रिक गोंधळ, ‘या’ केंद्रावरील परीक्षा पुन्हा घेण्याची नामूष्की
Top News

CET Cell : बीएड परीक्षेत तांत्रिक गोंधळ, ‘या’ केंद्रावरील परीक्षा पुन्हा घेण्याची नामूष्की

CET Cell BEd Exam Technical Issue

CET Cell BEd Exam Technical Issue : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test) शैक्षणिक वर्षे २०२६-२७ (Academic Year 2026-27) साठी घेतल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला (BEd Course Exam) २७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. मात्र, काल नियोजित असलेली एमजीएम अॅकादमी परभणी, गुलजार एज्युकेशन सोसायटी संचलित मराठवाडा ऑनलाइन एक्झाम सेंटर नांदेड, वैनगंगा काॅलेज ऑफ इंजिनि्रिंग अँड मॅनेजमेंट डोंगरगाव, नागपूर या तीन नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रावरील परीक्षा तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात असून सदर केंद्रावरील सीईटी परीक्षा पुनर्नियोजित (CET exam rescheduled) करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सदरील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – जळगावच्या हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकाचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

दरम्यान, याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा केंद्र व परीक्षेची वेळ त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईलवर कळवण्यात येईल. तसेच परीक्षार्थिंना सुधारित प्रवेशपत्र त्यांच्या लाॅगिन आयडीवर उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांना तिथून ते लाउनलोड करता येणार आहे. तसेच सुधारित प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेस परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाण्याचे आवाहन, सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अनेक संगणक बंद

परभणी शहरातील एमआयडीसी भागातील एमजीएम महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर काल शुक्रवारी २७ मार्च रोजी सकाळपासून प्रचंड गोंधळ उडाला आहे. या केंद्रावर अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अनेक संगणक बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. परिणामी, परीक्षेसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव

परीक्षेतील या गैरसोयीची माहिती मिळताच प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव घेतली. त्यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीईटी सेलकडून संबंधित परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे सूचनापत्र जाहीर केले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts