Gas Cylinder Delivery : अमेरिका इस्त्राईल आणि इराण युद्धाचा भारतावर परिणाम होत असून नाशिकच्या मनमाड – नांदगाव रोडवरील पानेवाडी धोटाने शिवारात असलेल्या इंधन कंपन्या आणि गॅस कंपनी वर काय परिणाम झाला आहे.. इंधन व गॅस सिलेंडर वितरण सुरळीत सुरू आहे का? की आणखी काही दिवस असेच नागरीकांना घरगुती आणि व्यावसायिक गॅससाठी धावपळ करावी लागणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी धोटाने शिवारात इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस रिपेरिंग प्लांट आहे. मात्र इंडियन गॅस रिफिलिंग (बॉटलिंग) प्लांटमधून होणाऱ्या गॅस वितरणात अचानक मोठी घट झाली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात कमर्शिअल सोबतच घरगुती एलपीजी गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान घरगुती गॅस साठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत लागत आहे.
टँकरद्वारे इंधन पेट्रोल डिझेल पंपापर्यंत
पानेवाडी धोटाने शिवारात असलेल्या इंधन कंपनीतून उत्तर महाराष्ट्रात टँकरद्वारे इंधन पेट्रोल डिझेल पंपापर्यंत पोचवले जाते. आखाती देशात युद्ध जरी सुरू असले तरी याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला नसल्याचे ट्रान्सपोर्ट धारकांचं म्हणणं आहे.
गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम
मनमाड जवळील इंडियन बॉटलींग प्लांट मधून नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात होणाऱ्या गॅस सिलेंडर पुरवठ्यावर सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परिणाम झाला आहे,रोज गॅस प्रकल्पातून 100 गाड्या भरून गॅस सिलेंडरची वाहतूक होत असे, मात्र आता त्याची संख्या घटली असून केवळ 30 ते 35 गाड्याच गॅस सिलेंडर भरून बाहेर पडत आहे,त्यातच प्रकल्पातील 2 फिलिंग पॉईंट पैकी केवळ एकच पॉईंट सुरू आहे, गुजरातच्या हाजीराबाद येथून गॅस टँकर येत असले तरी पुढील युद्धजन्य परिस्थिती पाहता ग्राहकांना टंचाई जाणवू नये यासाठी कोटा कमी करण्यात आला असला तरी रोजच गाड्या सिलेंडर भरून जात असल्याचे सांगण्यात येतय.
गॅस प्लांट मधून मागणी कमी
एकंदरच मनमाड शहरापासून नजीक असलेल्या पानेवाडी धोटाने परिसरातील इंधन कंपन्यांमधून इंधन पुरवठा सुरळीत सुरू असले तरी याच परिसरात असलेल्या गॅस प्लांट मधून मागणी कमी असल्याने वितरणावर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.. आखाती देशात सुरू असलेले युद्ध असेच सुरू राहिले तर भविष्यात मात्र सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे..











