Dharmendra Last Wish : आपल्या जवळच्या व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा आपल्याकडून पूर्ण झाली तर, त्यातून मिळणारा आनंद फार मोलाचा असतो. पण ती इच्छा अपूर्ण राहिली तर त्यापेक्षा मोठी दुःख काहीच नाही. असंच काहीस धर्मेंद्र यांच्या बाबतीत घडलं आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा परारली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल.
काय म्हणाले, दिग्दर्शक अनिल शर्मा
धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा काय होती, याबद्दल आता मोठी माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याकडे धर्मेंद्र यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. अनिल म्हणाले, धर्मेंद्र यांची एक इच्छा होती, जी आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं आहे. ‘ मी बॉबी देओल यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा धर्मेंद्र तिथे बसलेले होते आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक जण येत जात होते. ते मला देखील भेटले आणि त्यांनी मला मिठी मारली. आणि मला विचारलं देखील सध्या काय करत आहेस. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक विनंती केली.
कॅमरा माझी प्रियसी आहे
‘धर्मेंद्र मला म्हणाले अनिल मला एक चांगली भूमिका दे. मला आज देखील काम करायचं आहे. कॅमरा माझी प्रियसी आहे. ती मला बोलवत आहे. मला तिच्याकडे जायचं आहे. काहीही कर पण मला चांगली भूमिका दे. माझ्यासाठी एक चांगली भूमिका लिही. पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली, असं दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलं.
‘धर्मेंद्र यांनी मला तीन वेळी सांगितलं. मी देखील त्यांना वचन दिलं की, तुमच्यासाठी भूमिका लिहिणार. पण काही महिन्यात असं काही होईल याचा विचार देखील केला नव्हता. ती शेवटची संध्याकाळ माझी त्यांच्यासोबत. मला असं वाटलं की ते 90 वर्ष जगतील. त्यांचं कॅमे यावर प्रेम होतं, त्यांनी कधीच त्याचा व्यवसाय केला नाही.’ असं देखील अनिल शर्मा म्हणाले.
अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. घरी आल्यानंतर कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची तयारी देखील सुरु केली. पण 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.












