US-Iran War | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध थांबायचं नाव काही घेत नाहीये. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला होता, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार झाले. यानंतर इराण देखील आक्रमक झाला आणि या युद्धाने भयानक रूप धारण केले. इराणने देखील अमेरिका, इस्त्रायवर ड्रोन, मिसाईलने जोरदार हल्ला करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या तीन देशांमधील युद्ध जास्तच पेटत गेलं. तर आता इराणच्या सततच्या हल्ल्यामुळे अमेरिकेने एक पाऊल मागे घेतले आहे. अमेरिकेने 5 दिवसांकरीत युद्धबंदीची घोषणा केली आहे. मात्र, इराणने यावर अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.
हेही वाचा – ‘धुरंधर 2’मधील आर. माधवनच्या ‘त्या’ सीनवरून पेटला वाद; शिवसेना नेत्यांनी दिली आंदोलनाची चेतावणी
इराणने अमेरिकेला नेमका काय इशारा दिला?
अमेरिकेने इराणला होर्मुझ खाडी खुली करण्याकरिता 48 तासांचा वेळ दिला होता. मात्र, यानंतर इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. जर अशा धमक्या देत असाल तर होर्मुझ खाजी पूर्णच बंद करू, अशी थेट धमकी इराणने अमेरिकेला दिली होती. यानंतर अमेरिकेने 5 दिवसांची युद्धबंदी जाहीर केली आहे. यानंतरसुद्धा इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे.
जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हे युद्ध बंद होणार नाही, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.
युद्ध कधी संपणार? इस्त्रायलच्या अधिकाऱ्याने सांगितली तारीख
दुसरीकडे यादरम्यान इस्त्रायलच्या अधिकाऱ्याने या युद्धबंदीबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जे युद्ध सुरू आहे ते 9 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. जर ठरलेल्या प्लॅनिंगनुसार सर्वकाही व्यवस्थित झाले तर 9 एप्रिलला हे युद्ध संपू शकते, असा दावा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याने केला आहे.
अमेरिका आणि इराण या देशांमधील युद्धाच्या समाप्तीबाबत पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी हे युद्ध संपवण्यामागे मोठे कारण आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 2025 च्या अखेरीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबल शांतता पुरस्कान न मिळाल्याने त्यांना एका विशेष सन्मानाने गौरवले जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे जर 9 एप्रिलला युद्ध संपले तर इस्त्रालय साधारणपणे 21 ते 22 एप्रिलदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘इस्त्रायल पुरस्कार’ प्रधान करणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धबंदीची मोठी घोषणा केली आहे.












