Donald Trump | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. वाढत्या संघर्षामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मध्य पूर्वेतील हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच अता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी खळबळजनक दावा केला आहे. इराणने अमेरिकेसाठी 20 तेलाचे टँकर पाठवले असल्याचा मोठा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा – दहशतवादी कट उधळला! शब्बीर अहमदला केली अटक, लष्कर-ए-तोयबा मॉड्यूलचा पर्दाफाश
इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला?
इराणने सन्मानाचे प्रतीक म्हणून अमेरिकेसाठी कच्च्या तेलाचे 20 मोठे जहाज पाठवले असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एकिकडे इराणने मित्र देशांच्या जहाजांना सूट देत बाकी देशांच्या जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केला आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केल्याने संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
खासगी विमान ‘एअर फोर्स वन’वरून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी होर्मुझ सामुद्रधुनीतून 20 मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. यासाठीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल. सुरूवातीला इराण देश 10 जहाजे पाठवणार होता मात्र आता त्यांनीच जहाजांच्या संख्येत वाढ केली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
युद्धात इराणने हार मानली?
पुढे ते म्हणाले की, आम्ही आजही इराणची अनेक महत्त्वाची ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे. आम्ही केलेल्या हल्ल्यामुळे इराणचे नौदल आणि हवाईदल जवळपास नष्ट झाले आहे. तसेच सध्या आम्ही इराणशी बोलत आहोत, सोबतच गरजेप्रमाणे हल्लाही करत आहोत, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
#WATCH | US President Donald J Trump says, “… I can’t define it exactly, but they (Iran) gave us, I think as a sign of respect, 20 boats of oil, big, big boats of oil going through the Hormuz Strait. That’s taking place starting tomorrow morning, over the next couple of… pic.twitter.com/ZAD0T9Ao4U
— ANI (@ANI) March 30, 2026
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर युद्धात इराणने हार मानली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच इराण ट्रम्प यांच्या या दाव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










