IPL Top 5 Bowlers | आत्तापर्यंत इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहास काही असे गोलंदाज (Bowlers) आहेत ज्यांनी सर्वाधित निर्धाव षटके टाकत इतिहास रचला आहे. या गोलंदाजांनी आपल्या अफलातून गोलंदाजीने बॅट्समनला घाम फोडला आहे. तर आयपीएलच्या इतिहासात असे पाच गोलंदाज आहेत ज्यांनी संघांना मोठे यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर आता आपण या पाच गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.
हेही वाचा – गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर; शरद पवारांचं केलं कौतुक, म्हणाले, “त्यांनी सर्वसामान्यांना…”
कोण आहेत आयपीएलमध्ये इतिहास रचणारे पाच गोलंदाज?
आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याऱ्या पाच गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर नाव येते ते भुवनेश्वर कुमारचे. भुवनेश्वर कुमारने अफलातून अशी गोलंदाजी करत अव्वल स्थान निर्माण केले आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात 190 सामन्यांमध्ये गोलंदाजी केली असून 27.33 च्या सरासरीने त्याने 198 बळी घेतले आहेत. तसेच भुवनेश्वरने एकूण 14 निर्धाव षटके टाकली आहेत, ज्यामुळे बॅट्समनला घाम फुटला होता.
दुसऱ्या क्रमांकावर नाव येते ते प्रवीण कुमार यांचे. प्रवीण कुमार यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून खूप आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, प्रवीण कुमार यांनी आयपीएलमध्ये दमदार अशी कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. त्यांनी आयपीएलच्या इतिहासात 199 सामन्यांमध्ये गोलंदाजी करत 36.12 च्या सरासरीने 90 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 14 निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम प्रवीण कुमार यांच्या नावावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर नाव येते ते न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टचे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून बोल्टला ओळखलं जातं. तर बोल्टने आयपीएलच्या इतिहासात धुमाकूळ घातला आहे. त्याने 11 निर्धाव षटके टाकली असून 26.2 च्या सरासरीने 143 बळी घेतले आहेत.
पुढे चौथ्या क्रमाकांवर नाव येते इरफान पठाणचे. इरफान पठाणने आयपीएलमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. त्याने 103 सामने खेळले असून 33.11 च्या सरासरीने 80 बळी घेतले आहे. तर 10 निर्धाव षटका त्याने टाकल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर नाव येते ते अफलातून गोलंदाज जसप्रीत बुमराहचे. बुमराह हा नेहमी अचूक, संयमीपणे आणि प्रभावी अशी गोलंदाजी करताना दिसतो. त्याने आयपीएलच्या इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बुमराहने आत्तापर्यंत 145 आयपीएल सामने खेळले आहेत. तर त्याने 22.02 च्या सरासरीने 183 बळी घेतले आहेत. तसेच बुमराहने एकूण आठ निर्धाव षटके टाकली आहेत.








