Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • नवरात्री ते गुढीपाडवा…नववर्ष सणांनिमित्त पीएम मोदींचा खास संदेश; देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Top News

नवरात्री ते गुढीपाडवा…नववर्ष सणांनिमित्त पीएम मोदींचा खास संदेश; देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

PM Narendra Modi | आज संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात केले जात आहे. नवरात्री (Navratri), गुढीपाडवा (Gudi Padwa), चेती चंद (Cheti Chand) आणि उगादी (Ugadi) या सणांचा उत्साह संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. त्यामुळे या सणांनिमित्त संपूर्ण देशभरात मोठी धामधूम सुरू असून जल्लोषाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – मनसे मेळाव्यात राज ठाकरे फोडणार डरकाळी; राजकीय रणशिंग फुंकत कोणावर साधणार निशाणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सध्या सुरू असलेल्या सर्व सणांनिमित्त देशात शांती, शिस्त आणि सकारात्मत ऊर्जा ओसंडून वाहो, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींनी सर्व नागरिकांना दिल्या खास शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियवरील ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची पूजा केली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देत म्हटलं की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता दुर्गेच्या पहिल्या रूपाचे शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनामध्ये शांती, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा येतो. तसेच इच्छापूर्ती करणाऱ्या मातेसमोर मी नतमस्तक होतो. माता ही बैलावर आरूढ आहे, तिच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे आणि हाती त्रिशूल आहे. कोट्यावधी भारतीयांच्या वतीने विश्वमाता दुर्गेच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच नवरात्रीच्या या पवित्र, मंगलप्रसंगी आदिशक्तीला मी प्राथर्ना करतो की मातेने सर्वांवार प्रेम करून करूणेचा वर्षाव करावा. जय माता दी!, असं पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे.

पुढे पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येणार सण आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला पाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच पंतप्रधान मोदींनी चेती चंद सणाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. चेती चंद हा सिंधी समाजाचा सण असून तो सण त्यांचे नववर्ष म्हणून साजरे केले जाते. तर चेती चंद हा सण सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि समाधानाचा जावो, असं म्हणत पंतप्रधानांनी सर्वांना चेती चंद सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधानांनी उगादी सणाच्या देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts