Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलने व्यक्त केला संताप, म्हणाली, त्या माणसावर…
Top News

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलने व्यक्त केला संताप, म्हणाली, त्या माणसावर…

Gautami Patil On Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच खरातने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या जमीन-जुमला देखील खरातमे लुटल्या आहेत. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी ढोंगी खरातला अटक केली आहे. सध्या खरात प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. तर एसआयटीच्या तपासात दररोज धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे.

हेही वाचा – दारू घोटाळा प्रकरणात आज निर्णायक सुनावणी; केजरीवाल स्वतः कोर्टात युक्तिवाद मांडणार?

अशोक खरात प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येताना दिसत येत आहेत. काल (5 एप्रिल) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशोक खरातवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा लोकांना चांगलंच ठेचून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली होती. तर आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने अशोक खरात प्रकरणावर आक्रमक होत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने सरकारकडे मोठी मागणी देखील केली आहे.

अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाली गौतमी पाटील?

सोलापूर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्र गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोलपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर या कार्यक्रमानंतर गौतमीने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतमीने अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले.

माध्यमांनी गौतमीला अशोक खरात प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यावर ती म्हणाली की, भोंदू अशोक खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि खरातवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आपल्या देशात परत अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, त्यामुळे आत्ताच खरातवर कडक कारवाई केली पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली.

दरम्यान, अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. याच ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पोलीस चौकशी करत होते. यामध्ये पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेत त्याची दोन दिवस कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने पोलिसांसमोर कबूल केले की, आमच्या घरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कॅश येत होती. ते पैसे कुठून येत होते याबाबत मला काहीही माहिती नाही. कारण या पैशांचे सर्व व्यवहार डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धने दिली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts