गोवा :
शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यात एका नाईटक्लबमध्ये आग लागली. यात किमान 25 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी सांगितलं की आग सिलिंडरच्या स्फोटामुळं लागली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की मृतांमध्ये बहुतेक क्लबमधील स्वयंपाकघरातील कामगार होते, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांनी असंही सांगितले की मृतांमध्ये तीन ते चार पर्यटक देखील आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री :
घटनास्थळी पोहोचलेल्या सावंत यांनी पत्रकारांना सांगितलं की 23 जणांपैकी तीन जण भाजल्यानं आणि उर्वरित गुदमरल्याने मृत्युमुखी पडले. परंतु, नंतर मृतांचा आकडा 25 वर पोहोचला. गोवा पोलिसांनी सांगितलं की, “उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील रोमियो लेनजवळील बर्च इथं भीषण आग लागली, ज्यामध्ये चार पर्यटक आणि 14 क्लब कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभाग तपास करत आहेत. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात आहे. बहुतेक मृत्यू धुरामुळं श्वासोच्छवासामुळं झाले आहेत.”
क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं जात नव्हतं :
At least 23 died after a massive fire broke out in a birch night club at Goa’s Arpora in the midnight. Most victims are staff including 4 tourists. Cylinder blast is suspected. Prayers.#ImranKhan #IndiGoCrisis #MessiahOf_TheFarmers pic.twitter.com/RnZctn1oMi
— The बटुकनाथ (@suryaka96102572) December 7, 2025
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या माहितीनुसार, नाईट क्लब अग्निसुरक्षा नियमांचं पालन करत नव्हता. मध्यरात्रीनंतर बिर्च बाय रोमियो लेन येथे आग लागली. गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 25 कीमी अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात गेल्या वर्षी हे लोकप्रिय पार्टी स्थळ उघडलं गेलं. सावंत म्हणाले, “सुरक्षा नियमांचं उल्लंघन करुनही क्लब व्यवस्थापन आणि त्याला काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करु किनारी राज्यातील पर्यटन हंगामातील ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” गोवा पोलीस प्रमुख आलोक कुमार म्हणाले की आग सिलिंडरच्या स्फोटामुळं लागली.
The fire mishap in Arpora, Goa is deeply saddening. My thoughts are with all those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. Spoke to Goa CM Dr. Pramod Sawant Ji about the situation. The State Government is providing all possible assistance to those…
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2025
राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स-पोस्टवर या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं की, “गोव्यातील अर्पोरा येथील आगीची घटना खूप दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझे संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत.” गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो. राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.” या घटनेवर दुःख व्यक्त करताना राष्ट्रपतींनी लिहिलं की, “उत्तर गोवा जिल्ह्यातील आगीच्या दुर्दैवी घटनेनं खूप दुःख झालं आहे, ज्यामध्ये अनेक मौल्यवान जीव गेले आहेत. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. या कठीण काळात त्यांना धैर्य मिळो. जखमींच्या लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो.” दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 500000 रुपये भरपाई जाहीर केली आहे.
स्थानिक क्लब परवाने रद्द केले जाणार :
स्थानिक भाजपा आमदार मायकल लोबो म्हणाले, “सर्व 23 मृतदेह परिसरातून बाहेर काढण्यात आले आहेत आणि बांबोलीम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.” लोबो यांनी पत्रकारांना सांगितले की अग्निशमन दल आणि पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि रात्रभर बचाव कार्यात काम केले. लोबो म्हणाले की अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून अधिकारी सर्व क्लबचे अग्निसुरक्षा ऑडिट करतील. आमदार म्हणाले की, कलंगुट पंचायत सोमवारी सर्व नाईटक्लबना नोटीस बजावेल आणि त्यांना अग्निसुरक्षा परवाने घेण्यास सांगेल. त्यांनी असंही सांगितलं की ज्या क्लबकडे आवश्यक परवानग्या नाहीत त्यांचे परवाने रद्द केले जातील.












