Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • गुढीपाडव्याचा जल्लोष सुरू! मुंबई, ठाणे, नागपूरसह राज्यभर शोभायात्रांना सुरुवात
Mumbai

गुढीपाडव्याचा जल्लोष सुरू! मुंबई, ठाणे, नागपूरसह राज्यभर शोभायात्रांना सुरुवात

Gudi Padwa 2026 | आज गुढीपाडवा (Gudi Padwa) आणि मराठी नववर्ष आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) उत्साहाचे वातावरण असून एकच जल्लोष केला जात आहे. तसेच गुढीपाडव्यानिमित्त मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), पुणे (Pune), ठाणे (Thane) यांसह अनेक भागांमध्ये शोभा यात्रेचे (Shobha Yatra) आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी शोभा यात्रा काढल्या जात असून उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा – आज राष्ट्रपती स्थापन करतील श्रीराम यंत्र; अयोध्यात संपन्न होणार ऐतिहासिक सोहळा

गुढीपाडव्यानिमित्त राज्यभर शोभा यात्रेचे आयोजन

नागपूरमध्येही गुडीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर या शोभा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातही शोभा यात्रा काढण्यात आली असून या शोभा यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत.

नागपूरमधील शोभा यात्रेमध्ये सामूहिक राम रक्षा पठण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही आपले नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मी आपण येथे आलो आहोत. आजचा दिवस आपल्यासाठी मोठा उत्सव आहे. आपण सर्वांनी नवसंकल्प घेऊन आता पुढे जाऊया.तसेच आजच्या या शोभा यात्रेत आपण सर्व पारंपारिक वेषात आल्यामुळे सर्व वातावरण भगवामय झाले आहे. ही गुढी भारताची गुढी असून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहो, अशा शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे ठाण्यात देखील गुढीपाडव्यानिमित्त कोपीनेश्वर मंदिर या ठिकाणी पालखी सोहळ्याला सुरूवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे असे अनेक नेतेमंडळी उपस्थित आहेत.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये मोठी सजावट करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली असून तिथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त देवीची शिवकालीन दानिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली असून पहाटे 4 वाजता देवीची आरती करण्यात आली.

दरम्यान, आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नवीन वर्षानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येकाने आपल्या घरी परंपरेनुसार गुढी उभारली आहे. तर प्रत्येक ठिकाणी महिला पारंपरिक वेशात दिसत आहेत. डोंबिवलीत स्वागत यात्रेमध्ये पारंपारिक वेशात महिला रायडर्सने मोठा सहभाग घेतला आहे. तर संपूर्ण राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत केले जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts