Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिवचरित्र अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल संशोधन करणारे इतिहासकार हरपले
Pune

शिवचरित्र अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल संशोधन करणारे इतिहासकार हरपले

शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळाली आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल संशोधन केले आणि मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहे.

गजानन मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांच्यासारख्या दिग्गजांच्या परंपरेला ते पुढे घेऊन गेले. गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी इतिहास संशोधनासाठी आपलं जीवन वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते मोठे अभ्यासक होते. इतिहासाचा अभ्यास करताना ते फक्त एकाच भाषेत रमले नाहीत. त्यांना फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी मूळ ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला. खासकरून मोडी लिपी आणि फारसी दस्तऐवजांवर त्यांचं प्रभुत्व होतं.

मेहेंदळे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल संशोधन केलं. त्यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. जे आज जगभरातील इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ मानले जातात. मेहेंदळे फक्त भूतकाळाचाच अभ्यास करत नव्हते. ते वर्तमानाशीही जोडलेले होते. मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर असल्याने त्यांना युद्धनीतीचं सखोल ज्ञान होतं.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते युद्ध पत्रकार म्हणून हजर होते. त्यांच्या निधनाच्या वेळी ते दुसऱ्या महायुद्धावर एका मोठ्या ग्रंथाचं काम करत होते. त्याची जवळपास ५ हजार पानं लिहून तयार झाली होती.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts