आज 22 सप्टेंबर रोजी कर प्रणाली मध्ये बदल करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या ‘जीएसटी 2.0′ या बदलामुळे कर रचना अधिक सोपी होणार आहे.
आज झालेल्या जिएसटी मधील बदलामुळे अनेक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा परिणाम दिसून येईल. या बदलाचा मुख्य उद्देश कर रचना सुलभ करणे, अनुभव वाढवणे आणि दरांना विचारपूर्वक बनवणे हा आहे.तसेच नवीन धोरणानुसार, जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब 5% आणि 18% निश्चित करण्यात आले असून तंबाखू, दारू आणि एरेटेड ड्रिंक्स यांसारख्या वस्तूंवर 40% इतका टॅक्स लागू राहणार आहे.
आजपासून काय स्वस्त होणार?
दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजे, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, आणि ज्या घरगुती वस्तूंवर सध्या 12 टक्के जीएसटी वसूल केला जातो. आता हा स्लॅब 5 टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता आहे. यामुळे बिस्किटे, स्नॅक्स, ज्यूस, तूप आणि दुग्धजन्य पदार्थही स्वस्त होईल. सायकल स्टेशनरी यासारख्या वस्तूंवर देखील कमी जीएसटी लागणार आहे. तसेच काही कपडे आणि बूटही कमी दरात उपलब्ध होणार आहे. यासह घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, एअर कंडीशनर (AC), रेफ्रिजरेटर, डिशवॉशर , मोठ्या स्क्रीनचे टीव्ही, बांधकाम आणि गृहनिर्माणासाठी महत्त्वाचे असलेले सिमेंटही स्वस्त होणार आहे.
यापूर्वी ज्या वस्तूंवर 28% जीएसटी लागू होता, त्या वस्तूवर आता 18% पर्यंत जीएसटी कमी केला जाऊ शकतो. म्हणूनच या वस्तूंच्या किमती 7-8 टक्क्यांनी कमी होतील. ऑटोमोबाईल क्षेत्रात छोट्या कार आणि टू-व्हीलर, लक्झरी कार, विमा आणि वित्तीय सेवा यावरील जीएसटी कमी होणार आहे. छोट्या कार आणि टू-व्हीलर ज्या 1,200cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या छोट्या कारवरील जीएसटी 28 टक्क्यावरून 18 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. विमा आणि वित्तीय सेवा वर देखील जीएसटी कमी करण्यात आला आहे. सध्या विमा प्रीमियमवर 18% जीएसटी लागतो, ज्यामुळे तो महाग असतो. ‘जीएसटी 2.0′ मध्ये हे दर कमी केले जाऊ शकतात किंवा काही प्रकरणांमध्ये पूर्णपणे सूट दिली जाऊ शकते, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना विमा खरेदी करणे सोपे होणार आहे.
कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार?
1) खाद्यपदार्थ : अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा, खाखरा.
2) शैक्षणिक साहित्य : पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या. व्यायामपुस्तक, आलेखपुस्तक, प्रयोगशाळेच्या नोटबुक आणि नोटबुकसाठी वापरले जाणारे अनकोटेड पेपर, पेपरबोर्ड. नकाशे, इत्यादी.
3) आरोग्य क्षेत्र : 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा.
कोणत्या वस्तूंवर 5 टक्के GST?
1) खाद्यपदार्थ : वनस्पती तेल, ब्राझील नट्स, संत्री, दुग्धजन्य पदार्थ, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी.
2) शाम्पू, तेल, साबण, शेव्हिंग क्रीम, दंत फ्लॉस, टूथपेस्ट, टूथ पावडर, टॉयलेट साबण.
3) किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्त्या, टेपर्स आणि तत्सम, हस्तनिर्मित मेणबत्त्या, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर.
4) कृषी साहित्य : ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप.
5) वैद्यकीय वस्तू : थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे.
6) नक्षीकाम केलेल्या वस्तू, हस्तनिर्मित कागद आणि पेपरबोर्ड, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स, कार्टन्स, बॉक्स.
कोणत्या वस्तूंवर 18 टक्के GST?
1) इलेक्ट्रॉनिक वस्तू : एअर-कंडिशनिंग मशीन, वॉशिंग मशीन, एलईडी- एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर.
2) वाहनं : लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने
3) ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप.
4) कोळसा; ब्रिकेट, ओव्हॉइड्स आणि तत्सम घन इंधन कोळशापासून बनवलेले
लिग्नाइट.
5) पोर्टलँड सिमेंट, ॲल्युमिनियम सिमेंट, स्लॅग सिमेंट, सुपर सल्फेट सिमेंट आणि तत्सम हायड्रॉलिक सिमेंट.