Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं ओढायचा? स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यांच्या….”
Top News

अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं ओढायचा? स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यांच्या….”

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला अटक केली आहे. तर सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर चौकशीदरम्यान खरातला कसलाही पश्चाताप झाला नसल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा – दुनिया झुकती है…, कोठडीत असूनही खरातची अकड कमी नाही; केलं खळबळजनक वक्तव्य

पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अशोक खरातने सर्व कृत्यांची कबुली दिली आहे. खरातने पोलिसांसमोर कबुली देताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच त्याने दुनिया झुकती है, सिर्फ झुकानेवाला चाहिए, असं धक्कादायक वक्तव्यही चौकशीदरम्यान केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खरातचा माज कमी झाला नसल्याचं दिसत आहेत.

खरातने महिलांना कसं अडकवलं आपल्या जाळ्यात?

अशोक खरातने आपल्या जाळ्यात महिलांना कसं अडकवलं? याबाबतची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. चौकशीदरम्यान तो म्हणाला की, मी महिलांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी कोणत्याही मंत्र-तंत्राचा वाप केला नाही. मी फक्त त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर केला आणि त्यांना भीती दाखवली. तसेच मी त्यांच्या भीतीचा फायदा घेतला, अशी कबुली खरातने दिली आहे, ज्यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

पुढे त्याने सांगितले की, मी महिलांना जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांच्या मनात भिती निर्माण करत होतो. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखत होतो. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना हवं ते उत्तर देऊन त्यांचा विश्वास संपादन करत होतो, असंही खरातने सांगितलं.

लोकांना फसवण्यासाठी नेमकं काय करत होता खरात?

मी लोकांना फसवण्यासाठी कोणतेही चमत्कार करत नव्हतो. मी फक्त विज्ञानातील साध्या ट्रिक वापरत होतो आणि हातचलाखी करून लोकांना गंडवत होतो. तसेच मी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. तसेच लोकांना चमत्कार बघण्याची खूप हौस असते त्यामुळे मी त्यांना तेच दाखवलं, असा धक्कादायक खुलासाही खरातने केला आहे.

ढोंगीबाबा खरातने दिलेल्या या जबाबानंतर पोललिसही हादरले आहेत. तसेच त्याला त्याने केलेल्या कृत्याबाबत कसलाही पश्चाताप नसल्याचं समोर आलं आहे. खरातने अनेक विवाहित महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण करत त्यांची फसवणूक केली आहे. तसेच त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमीन-जुमला देखील लुबाडल्या आहेत. तर त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे.

दरम्यान, अशोक खरातने दिलेल्या या जबाबानंतर पोलिसांनी आता पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. विज्ञानाचा वापर करत खरातने आत्तापर्यंत किती जणांना लुबाडले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. सोबतच पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असं आवाहनी पोलिसांनी केले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts