Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • खायला अन्न नाही, शाळा बंद, पेट्रोल महागले…; पाकिस्तानात गंभीर संकट, इफ्तार पार्ट्यांवर सरकारची बंदी
Top News

खायला अन्न नाही, शाळा बंद, पेट्रोल महागले…; पाकिस्तानात गंभीर संकट, इफ्तार पार्ट्यांवर सरकारची बंदी

Impact of the war on Pakistan | इस्त्रायल (Israel), अमेरिका (America) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेक देशांना बसला आहे. यामध्ये पाकिस्तानवर (Pakistan) या युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम गॅस, इंधन, तेलाच्या आयत-निर्यातीवर झाला आहे. देशात गॅस, इंधनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये इंधनाच्या आणि गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानने आता इफ्तार पार्टी करण्यावरही बंदी घातली आहे.

हेही वाचा – युद्ध थांबणार की भडकणार? संघर्षात नवा ट्विस्ट; इराणचा अमेरिकेला थेट इशारा, म्हणाले, युद्धाचा शेवट…

पाकिस्तानात इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे. सध्याची ही परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. इंधनाचा तुटवडा आणि वाढत्या महागाईमुळे पाकिस्तान सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तान सरकारने कोणते कठोर निर्णय घेतले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाचा बचाव करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता पाकिस्तानमधील शाळा आणि महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत. तसेच ऑनलाईन क्लास घेण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. यामुळे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल आणि पेट्रोल, डिझेलची बचत होईल, या अनुषंगाने हा निर्णय सरकारने घेतला आहे.

इफ्तार पार्टी करण्यावर सरकारने का आणली बंदी?

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. रमजानच्या या पवित्र काळात पाकिस्तानमध्ये युद्धामुळे प्रचंड महागाई वाढली आहे. इंधनासोबत फळे, भाज्या यांचे दर गगनाला भिडले आहेत. याचा मोठा फटका व्यावसायिकांना आणि ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकराने इफ्तार पार्टी आणि ऑफिशियल डिनर करण्यावरही बंदी आणली आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेतील इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पाकिस्तानने या संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरवाढीमुळे पाकिस्तानातील वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे.

पाकिस्तानमध्ये फक्त 26 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा असल्याची माहिती पुढे आली होती.  त्यामुळे आता डिझेल 335.86 रुपये प्रती लिटर तर पेट्रोल 321.17 रुपये प्रती लिटर दराने जनतेला विकत घ्यावं लागणार आहे. पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषदत घेत पेट्रोल दरवाढीची घोषणा केली. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमधील सुरु असलेल्या संघर्षामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याचं पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं.

आधीच महागाईने कंबरडं मोडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरली आहे. सत्तेवर आलेल्या नव्या सरकारसमोर आता या जनक्षोभाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts