Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • जगात खळबळ! इराणचा अमेरिकन सैनिकांबाबत धक्कादायक दावा, डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली
Top News

जगात खळबळ! इराणचा अमेरिकन सैनिकांबाबत धक्कादायक दावा, डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली

Iran-US War | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिका, इस्त्रायल इराणवर जोरदार हल्ले करत आहे. तर इराण देखील या दोन्ही देशांवर जोरदार प्रतिहार करताना दिसत आहे. त्यामुळे या तिन्ही देशांमधील युद्धाचा वणवा चांगलाच भडकला आहे. अशातच आता इराणने अमेरिकेच्या सैनिकांना आपल्या ताब्यात घेतले असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा – न्यूझीलंडच्या कर्णधाराचे जिव्हारी लागणारे शब्द, सुर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर

इराणने केला अमेरिकेला हादरवणारा दावा

इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी अमेरिकेला हादरवणारा दावा केला आहे. अलीकडील संघर्षादरम्यान इराणी सैन्यानं अमेरिकन सैनिकांना कैद केले असून अमेरिकेकडून ही बाब लपवली जात असल्याचा खळबळजनक दावा लारिजानी यांनी केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले केले जात आहे. तर त्याला प्रत्युत्तर देत इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य करत ड्रोनद्वारे प्रतिहल्ले केले आहेत. या संघर्षादरम्यान इराण सैनिकांनी काही अमेरिकन सैनिकांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणने अमेरिकेच्या सैनिकांबाबत काय सांगितलं?

इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणच्या सैनिकांनी अनेक अमेरिकन सैनिकांना अटक केली आहे. पण अमेरिका आपले सैनिका युद्धात मारले गेल्याचे सांगत आहे. मात्र, हे सत्य अमेरिकेला जास्त काळ लपवता येणार नाहीये, असं लारिजानी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल (7 मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले होते की, आजची रात्र ही इराण देशासाठी सर्वात वाईट रात्र असेल. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर काही तासांमध्येच इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या तेहराणमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले होते. इराणचे सर्व तेल प्रकल्प आगीत उद्ध्वस्त झाले असून मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इस्त्रायने तेहरानमधील तेल प्रकल्पावर हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर तेहरानमध्ये आगीचा भडका उडाला होता. तर तेहरानमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर इराण आणखी संतप्त झाला असून इराणनेही इस्त्रायवर प्रतिहार केला आहे.

या हल्ल्याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्त्रायलमधील हैफा येथील एका रिफायनरी प्रकल्पावर हल्ला केला आहे. तेहरानमधील तेल प्रकल्पावर केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचं इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts