Israel-Iran War | अमेरिका (US) आणि इस्त्रायने (Israel) मिळून इराण (Iran) देशावर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर इराणने आक्रमक होत अमेरिका आणि इस्त्रालयवर ड्रोन, मिसाईल टाकत मोठा हल्ला केला होता. या युद्धात तिन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या मध्यपूर्वेतील या युद्धाचा जोरदार फटका अन्य देशांनाही बसला आहे. अनेक देशांमध्ये गॅस, तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.
हेही वाचा – डोळ्याचं पाते लवते न लवते तोच निकाल! 2 मिनिटांत प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सिकंदरने जिंकली 2 लाखांची कुस्ती
मध्यपूर्वेतील युद्धामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ
अमेरिका-इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे प्रत्युत्तर म्हणून इराण अमेरिकेचे तळ असलेल्या देशांवर हल्ले करताना दिसत आहे. यामध्ये इराणने थेट दुबईवर मोठा हल्ला केला आहे. इराणने दुबई विमानतळाला टार्गेट करत मोठा हल्ला केला होता. तसेच आता इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या सामुद्रधुनीत अमेरिका, इस्त्रायलसह अनेक देशांचे तेलाचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे आता तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या प्रति बॅलरची किमत 200 डॉलरच्या पुढे जाणार असल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे.
इस्त्रायने इराणला नेमकी काय धमकी दिली?
दुसरीकडे इराण कोणत्याही परिस्थिती हार मानायला तयार नसल्यामुळे आता इस्त्रायलने आक्रमक होत मोठी धमकी दिली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठं वक्तव्य करत इस्त्रायलने भयंकर अशी धमकी दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामनेई यांना शोधून आम्ही ठार करू, अशी थेट धमकी इस्त्रायने दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, मोजतबा खामेनेई यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून ते सध्या रशियात आहेत. रशियात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. अशातच आता इस्त्रायलने मोजतबा खामेनेईंना शोधून ठार करू अशी धमकी दिली आहे, त्यामुळे इराणच्या टेन्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, इस्त्रायलने इराणच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले असल्याचा दावा केला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी सांगितले की, इस्त्रायने काल रात्री इराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी आणि रिव्होल्युशनरी गार्ड बासिज फोर्सचे प्रमुख जनरल गुलाम रझा सोलेमनी हे ठार झाले आहेत. त्यामुळे आता इराणचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे.












