Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कुलदीप यादव अडकला विवाहबंधनात; बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ
Top News

कुलदीप यादव अडकला विवाहबंधनात; बालपणीच्या मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ

Kuldeep Yadav Wedding | भारताचा स्टार क्रिकेटर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) लग्नबंधनात अडकला आहे. कुलदीप यादवने त्याची बालपणाची मैत्रिण वंशिका चड्डासोबत (Vanshika Chadha) लग्न केले आहे. वंशिका आणि कुलदीपचा शाही विवाह सोहळा पार पडला. तर आता कुलदीप यादववर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – मुंबईतील इंजिनिअरचा इराकमध्ये दुर्दैवी मृत्यू; अचानक झालेल्या हल्ल्यानंतर काळाने घातला घाला

कुलदीप-वंशिका यांच्या रॉयल लूकने वेधले सर्वांचे लक्ष

कुलदीप यादव आणि वंशिका चड्डा यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडमधील मसुरी येथील सवॉय हॉटेलमध्ये पार पडला. या शाही विवाह सोहळ्यात कुलदीप आणि वंशिकाने रॉयल लूक केला होता. वंशिकाने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर कुलदीपने गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती, ज्यामध्ये त्याला लूक एकदम रॉयल दिसत होता. तर वंशिका-कुलदीपच्या खास वेडिंग एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच कुलदीप आणि वंशिकाच्या लग्नात हॉटेलमध्ये खास डेकोरेशन करण्यात आले होते. सगळीकडे फुलांची आरास, खास दिवे लावण्यात आले होते.

कुलदीप-वंशिकाच्या लग्नाआधीच्या विधींना 13 मार्च या दिवशी सुरूवात झाली होती. यावेळी त्यांचे मेहंदी आणि हळदी समारंभातील खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर 14 मार्च रोजी कुलदीप आणि वंशिका लग्नबंधनात अडकले.

कुलदीप-वंशिकाच्या खास विवाहसोहळ्याला भारतीय संघातील अनेक मोठे खेळाडू उपस्थित राहिले होते. यामध्ये युजवेंद्र चहल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, नितीश राणा, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, भुवनेश्वर कुमार यांसारख्या अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. तसेच कुलदीपच्या लग्नाला बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी देखील हजेरी लावली होती.

कुलदीप-वंशिकाच्या लग्नात तिलक वर्मा, युजवेंद्र चहलने केला डान्स

सध्या कुलदीप आणि वंशिकाच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या विवाह सोहळ्यात युजवेंद्र चहल, तिलक वर्मा यांनी डान्स केल्याचंही दिसत आहे.

दरम्यान, कुलदीप आणि वंशिकाचा विवाह 2025 मध्येच होणार होता. मात्र, भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. गेल्या वर्षी 4 जून रोजी वंशिका आणि कुलदीपचा साखरपुडा झाला होता. तर आता टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर कुलदीपने वंशिकासोबत लग्नगाठ बांधली आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts