Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • संभाजीनगरमध्ये एलपीजीमुळे रिक्षाचालकांवर आर्थिक संकट, शहरातील ९० % पंप बंद
Top News

संभाजीनगरमध्ये एलपीजीमुळे रिक्षाचालकांवर आर्थिक संकट, शहरातील ९० % पंप बंद

LPG pump off

lpg shortage sambhajinagar : आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम (The Consequences of War) जगावर दिसून येत आहे. भारतामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, यांसह सर्व जीवन आवश्यक वस्तूवर त्याचा परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एलपीजी गॅस (Sambhajinagar LPG Gas) वरती चालणाऱ्या रिक्षावाल्यावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. शहरातील जवळपास ९०% ऑटो एलपीजी गॅस पंप बंद (90% LPG pumps off) आहेत. त्यामुळे रिक्षा कशा कसा चालवायचा घर कसं चालवायचा असा प्रश्न ऑटो रिक्षा चालकासमोर उभा राहिला आहे.

आज ही गॅस साठी बुकिंग होत नाही तर वीस ते पंचवीस दिवसानंतर गॅस मिळत आहे. भारतामध्ये आखाती देशाच्या युद्धामुळे रिक्षाचालक , हॉटेल व्यावसायिक,कंपन्या,यांचा वरती मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात ऑटो एलपीजी पंपावर गॅसचा तुटवडा जाणवत अनेक ठिकाणी गॅस संपल्याने पुन्हा एकदा ऑटो एलपीजी चालकावर उपासमारीची वेळ येणार आहे.

ऑटो एलपीजी मध्ये देखील मोठी वाढ झाल्याने ऑटो रिक्षा चालक चिंतेत आहेत 61 रुपयावर डायरेक्ट 96 कोठे 105.तर काही ठिकाणी 100 असे वेग वेगळे किमती असल्याने ऑटो एलपीजी रिक्षा चालक संभ्रम मध्ये देखील आहेत.एक प्रकारे रिक्षा चालकाची फसवणूक केली जात असल्याचे देखील या वरून समोर येत आहे.

या घटनेमुळे ऑटो रिक्षा चालक देखील संकटांना सामना करत आहेत एकतर वेळेवर गॅस मिळत नाही आणि मिळाला तर भाव वाढल्याने पॅसेंजर देखील एक रुपये ही वाढून देत नाहीत त्यामुळे घर कसं चालावा असा प्रश्नचिन्ह देखील आटो गॅस चालका सोमर उभा राहिला आहे .याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts