Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जालना महापालिकेचा पहिलाच 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर
Top News

जालना महापालिकेचा पहिलाच 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर

Jalna Municipal Corporation Budget

Jalna Municipal Corporation 468 crore budget : जालना महानगरपालिकेचा पहिलाच 468 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय. महापौर,आयुक्त आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यात आला. शहराच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेत हा अर्थसंकल्प अपुरा असल्याची टीका केली आहे.

जालना महानगरपालिकेचा 468 कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना शहराच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये पाणीपुरवठा,रस्ते, नाल्या,वीज व्यवस्था,शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या काळात निधी वाढवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले.

“हा 468 कोटींचा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी अपुरा आहे. अनेक प्रभागांना योग्य निधी दिला गेलेला नाही. शिक्षण, महिला व बाल विकास, तसेच दिव्यांगांसाठीही अपुरी तरतूद आहे. अर्थसंकल्पातील आकडेवारीतही घोळ असल्याचा आरोप.शिवसेनेचे विरोधी पक्षनेते ”कमलेश खरे, यांनी केलाय..

विरोधकांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर विरोधक फक्त राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलाय..हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.विरोधकांकडून केवळ विरोध करण्यासाठी विरोध केला जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर आम्ही प्राधान्याने काम करत आहोत.”

दरम्यान, या अर्थसंकल्पावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ही पाहायला मिळाले शहरातील प्रलंबित प्रश्न—पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा मुद्दा—यावर ठोस उपाययोजना अपेक्षित असल्याने आता या अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्षात कितपत उतरतात आणि जालना शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळते का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मात्र आगामी काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची कार्यक्षमता या अर्थसंकल्पाची खरी परीक्षा ठरणार हे मात्र निश्चित..

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts