Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महानगरपालिका निवडणुक: तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर इतर कोणते ओळखपत्र दाखवून करता येईल मतदाव; पाहा यादी
Top News

महानगरपालिका निवडणुक: तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर इतर कोणते ओळखपत्र दाखवून करता येईल मतदाव; पाहा यादी

Voting Documents

Voting Documents : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर आलं आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान करताना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतील ते जाणून घ्या. पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं मतदार ओळखपत्र. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर तुम्ही मतदान केंद्रावर इतर 12 कागदपत्रांपैकी एक सादर करुन मतदान करु शकता.

मतदान केंद्रावर यापैकी एक ओळखपत्र दाखवा :

मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर त्यांचं मतदार ओळखपत्र आणावं. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही ते मतदान केंद्रावर इतर 12 ओळखपत्रांपैकी एक सादर करु शकतात. ते पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारनं जारी केलेले फोटो असलेले ओळखपत्र आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, फोटो असलेले मतदार अपंगत्व प्रमाणपत्र, मनरेगा रोजगार कार्ड, पेन्शनशी संबंधित फोटो असलेली कागदपत्रे, खासदार आणि आमदारांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र किंवा केंद्रीय कामगार मंत्रालयानं दिलेले फोटो असलेले आरोग्य विमा कार्ड देखील दाखवू शकतात.

  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • सरकारनं जारी केलेले फोटो असलेली ओळखपत्र
  • फोटो असलेले बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक
  • फोटो असलेले मतदार अपंगत्व प्रमाणपत्र
  • मनरेगा रोजगार कार्ड
  • पेन्शनशी संबंधित फोटो असलेली कागदपत्रे
  • खासदार आणि आमदारांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेले फोटो असलेले आरोग्य विमा कार्ड

 

मर्यादित वैयक्तिक संपर्काबाबत प्रमुख आदेश :

दरम्यान, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी संध्याकाळी प्रचार कालावधी संपल्यानंतर मर्यादित वैयक्तिक संपर्कास परवानगी दिली. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांना घरोघरी प्रचारादरम्यान मायक्रोफोन वापरण्यास किंवा मोठ्या गटात फिरण्यास मनाई आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका केली आहे आणि असा आरोप केला आहे की हा निर्णय निवडणूक आयोगानं लादलेल्या निर्बंधांना कमकुवत करतो.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts