Donald Trump | अमेरिका (US) आणि इस्त्रायलने (Israel) 28 फ्रेब्रुवारी रोजी इराणवर (Iran) हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेचे अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचाही मृत्यू झाला होता. अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्याकडे इराणची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मोजतबा खामेनेई जाहीररित्या कधी समोर दिसले नाहीत. तर काही दिवसांपूर्वीच मोजतबा खामेनेई जखमी झाले असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोजतबा खामेनेई यांच्या जिंवत असण्याबाबत संशय व्यक्त केला आहे.
हेही वाचा – “शांत बसा अन् ऐका, एवढी कसली….”, भरसभेत नितीश कुमार यांनी महिलांना सुनावलं, नेमकं घडलं काय?
मोजतबा खामेनेईंबाबत काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
मोजतबा खामेनेई जिवंत आहेत की नाही? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सार्वजनिकरित्या मोजतबा खामेनेई एकदाही कुठे दिसले नाहीत. त्यांची इराणच्या सर्वोच्च पदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा पहिला संदेश जाहीरपणे न देता लेखी स्वरूपात देण्यात आला होता. त्यामुळे ते जिवंत आहेत की नाही, हे माहिती नाहीये, असं ट्र्म्प म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मोजतबा खामेनेई जिंवत असल्याचा कुठलाही पुरावा नाहीये. तसेच मी असं ऐकलं आहे की खामेनेई जिवंत नाहीयेत. पण जर ते जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशासाठी पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आत्मसमर्पण केलं पाहिजे, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत केला मोठा दावा
इराण हार मानून लवकरच शरण येईल, असं वक्तव्यही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून युद्धाची खरी स्थिती स्पष्ट होत आहे. इराण देश लवकरच हार मानून शरण येईल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.
दरम्यान, एकिकडे डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळे दावे करत असतानाच दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ज्या देशांच्या जहाजांना पुढे जायचे आहे त्यांनी आधी इराणी नौदलाशी समन्वय साधावा, अशी घोषणा इराणने केली आहे.
ज्या जहाजांना पुढे जायचे आहे त्यांनी इराणी नौदलाशी संपर्क साधावा. नौदलाशी चर्चा केल्यानंतर तुम्ही तुमचे तेल आणि गॅस टँकर जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून घेऊन जाऊ शकता. अमेरिका आणि इस्त्रायल या देशांचे जहाज वगळता अन्य देश आपले जहाज पुढे घेऊन जाऊ शकतात. मात्र, जे देश अमेरिकेला आणि इस्त्रायलला पाठिंबा देत आहेत अशा देशांना परवानगी नाकारली जाईल, असं इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.












