Mumbai Restaurant, Hotels Shutdown | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू असून या युद्धाचा मोठा फटका अनेक देशांना बसला आहे. यामध्ये या युद्धाचा परिणाम भारतावरही झालेला दिसत आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याला या युद्धाचा सर्वात मोठा फटका बसलेला दिसत आहे. महाराष्ट्रातील एलपीजी सिलिंडरचा (LPG Cylinder) पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मुंबईतील (Mumbai) हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा – अजितदादांच्या मृत्यूच्या तपासाबाबत आधी निष्कर्ष काढू नका; सुनील शेळकेंचा रोहित पवारांना टोला
जागतिक ऊर्जा बाजारात मध्य पूर्वेतील युद्धामुळे अस्थिरता आली आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा 50 ते 60 टक्क्यांनी घटला असून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. तर राज्यात गॅसची टंचाई झाल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील 100 टक्के हॉटेल्स बंद होणार?
गॅसच्या कमतरतेमुळे केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅसला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. कारण राज्यात हॉटेलसाठी लागणारा 19 किलोच्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून हॉटेल, रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत ‘आहार’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठी माहिती दिली. मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना मोठा फटका बसला आहे. तसेच आता 20 टक्क्यांपर्यंत आलेले हे प्रमाण आता 60 टक्क्यांवर येण्याची शक्यता असून उद्यापर्यंत मुंबईतील 100 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधला आहे, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली. तर बुधवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होऊ शकतात, अशी शक्यताही वडेट्टीवारांनी वर्तवली आहे.
गॅस सिलिंडरच्या बुकींग प्रक्रियेत बदल
दरम्यान, मध्यपूर्वेती युद्धामुळे भारतातील एलपीजी सिलिंडर गॅसचे दर 50 ते 60 रूपयांनी वाढले आहेत. अशातच आता गॅस सिलिंडर रीफील करण्याचे नियमही बदलण्यात आले आहेत. सरकारनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल केले आहेत.
याआधी एलपीडी गॅस सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागत होती. पंधरा दिवसांनंतर दुसरा सिलिडंर बूक करता येत होता. पण, आता नव्या नियमावलीनुसार हा वेटिंग टाईम वाढवण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता पहिला सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी पंधरा दिवसांऐवजी आता 21 दिवस वाट पहावी लागणार आहे. 21 दिवसांनंतर तुम्हाला दुसरा सिलिंडर बूक करता येणार आहे.
नव्या नियमांनुसार आता पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर हा 21 दिवसांनंतर मिळणार आहे. हे नवीन नियम कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केले आहेत. तसेच एलपीजी गॅस एजन्सीला तेल कंपन्यांनी गॅस बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत सिलिंडर देणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.











