Local body Elections : राज्यातल्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज बिगूल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आज महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठीची आचारसंहित जाहिर होणार का ? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात
सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या स्तरावर तयारीला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरून, दुबार मतदार यावरुन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र आयोगाने ही मागणी फेटाळल्याचं पाहायला मिळत आहे. तसचं निवडणूक आयोग हे कोर्टाने दिलेल्या वेळेत निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडणार ऐरणीवर
३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेईल, अशी योजना आखत आहे. यात सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या आक्षेपांना केराची टोपली
विरोधकांनी गेल्या काही दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळाबाबत राज्यभरात रान उठवले होते. निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मात्र, या सगळ्या आरोपांना आणि आक्षेपांना केराची टोपली दाखवत निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी शक्यता तुर्तास दिसत आहे.
महाविकास आघाडी आणि मनसेच शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी पोहोचलं
अनेक ठिकाणी मतदार याद्यात दुबार मतदार असल्याचा शिष्टमंडळाचा आरोप
मतदार याद्या स्वच्छ झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची मागणी@TV9Marathi #MaharashtraPolitics #maharashtra pic.twitter.com/Fo2DRljhWL
— Pramod Jagtap (@PramodSJagtap) November 4, 2025
आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोग निवडणुकाचं बिगुल वाजवणार का, हे स्पष्ट होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद. #स्थानिक_स्वराज्य_संस्था #लोकशाही #मत #मतदान #राज्यनिवडणूकआयोग #आयोग #महाराष्ट्र #महाराष्ट्रराज्य #SEC #SEC_Maharashtra #Elections #Democracy #Vote #Voting #StateElectionCommission pic.twitter.com/559Yw68fZB
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) November 4, 2025











