Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • नवीन फोन घेतलात? लगेच ऑन करा ही 5 सुरक्षा सेटिंग्ज, नाहीतर डेटा चोरीचा धोका!
Top News

नवीन फोन घेतलात? लगेच ऑन करा ही 5 सुरक्षा सेटिंग्ज, नाहीतर डेटा चोरीचा धोका!

New phone satting

New Phone Security: तुम्ही नवीन फोन घेतलेत किंवा नुकताच घेतला असेल, तर फक्त हे सिक्युरिटी सेटिंग्ज ऑन करा; नाहीतर तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर अनेक लोक लगेच अँप्स वापरण्यास सुरुवात करतात आणि महत्वाच्या सुरक्षा सेटिंग्ज दुर्लक्षित करतात. सुरुवातीला हे सोपे वाटत असेल तरी नंतर याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. Indian Cyber Crime Coordination Centre ने सतत इशारा दिला आहे की जर तुम्ही फोनच्या सुरक्षा फिचर्स सक्रिय केले नाहीत, तर तुमचा पर्सनल डेटा लगेच धोक्यात येऊ शकतो.

हेही वाचा: CCTV लावताय? आधी सरकारचे नवीन नियम वाचा; एक चूक आणि हजारो रुपयांचा दंड

फोन ट्रॅकिंग लगेच ऑन करा

नवीन दोन सुरू करताच सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रेकिंग फिचर सक्रिय करणे. Android वापरकर्ते Find My Device वापरू शकतात, तर iOS मध्ये ही सुविधा आधीच उपलब्ध असते. यामुळे फोन हरवल्यास त्याची लोकेशन तपासता येते, गरज [पडल्यास दुरून लॉक करता येतो किंवा डेटा डिलीट करता येतो.

रिमोट लॉक आणि ऑफलाईट ट्रेकिंग ऑन करा

फक्त ट्रेकिंग नव्हे, तर रिमोट लॉक आणि ऑफलाईन ट्रॅकिंग ऑन करणेही महत्वाचे आहे. त्यामुळे फोन इंटरनेट नसताना किंवा स्विच ऑफ असतानाही तुम्ही दुरून लॉक करू शकता. हे फिचर चोरी झालेल्या फोनला अनधिकृत व्यक्ती वापरण्यापासून रोखते.

नोटिफिकेशन प्रायव्हसी सुरक्षित ठेवा

ओटीपी, बँक अलर्ट आणि खाजगी मेसेजेस लॉक स्किनवर दिसत असल्यास कोणीही फोन अनलॉक न करता ही माहिती पाहू शकतो. सुरक्षिततेसाठी Lock Screen Preview बंद किंवा हायड करा. यामुळे संवेदनशील माहिती सुरक्षित राहते.

फोन बंद करताना पासवर्ड लावा

काही स्मार्टफोन ब्रँड्स जसे Realme, OPPO, OnePlus इत्यादींमध्ये फोन बंद करण्यासाठीपासवर्ड/ पिन आवश्यक असतो. हे ऑन केल्यास चोरी झालेल्या फोनला लागेच बंद करता येत नाही आणि ट्रेकिंग सुरू राहते.

SIM लॉक वापरा आणि फसवणूक टाळा

SIM संबंधित फसवणूक भारतात वाढली आहे. SIM लॉक ऑन केल्यास तुमची SIM दुसऱ्या फोनमध्ये वापरणे शक्य होत नाही, ज्यामुळे SIM स्वॅप स्कॅमपासून बचाव होतो.

सुरुवातीपासूनच सक्रिय करा

हे सुरक्षा फिचर्स फोन सुरू करताच सक्रिय केल्यास तुमचा डेटा सुरक्षित राहील, हरवलेला फोन परत मिळण्याची शक्यता वाढेल आणि भविष्यातील ऑनलाइन फसवणूक टाळता येईल.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts